“आले देवाजीच्या मना...” (By chance, luck or anything else?) (ललित लेख २७; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story २०१३ मध्ये मी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असतानाचा योगायोग ! “अहो, तुम्ही दोघे माझ्या आजी-आजोबांसारखे आहात म्हणून सांगतोय... अजून दोन दिवस थांबा... न्यूमोनियाच्या इंजेक्शनचा कोर्स पूर्ण होईल...” “न्हाई आता डाक्टर सायेब... शेतीची कामं हाईती... जित्राबं हायंत... लई कामं खोळांबल्यात... सुट्टी द्या आमास्नी...” “सगळं समजावून झालंय आजी; तरीही जायचंच असेल तर तुमच्या जबाबदारीवर सही करून जा...” “व्हय... नशीब आमचं... इट्टलाला काळजी... ” . . . . . संध्याकाळी एस. टी.च्या अपघाताची बातमी पोलिसांनी कळवली. त्यातील रुग्ण जेव्हा तपासणीसाठी माझ्याकडे आणले तेव्हा पाहतो तर काय, ‘ते’च आजी-आजोबा साक्षात स्ट्रेचरवर..! “... लेकरा, तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं...” आजी ‘कण्हत’ म्हणाल्या... “तसं काही नसतं आजी...” कुठल्यातरी ‘गूढ शक्तींबद्दलच्या’ विचारांत असताना मी म्हटलं... (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, ए...