Saturday, January 25, 2020

‘खरा’ चोर’ (The big fish and the small fish!)

‘‘खरा’ चोर’
(The big fish and the small fish!)
(ललित लेख १८;©  डॉ. अमित)

फोटो सौजन्य: व्हेक्टरस्टॉक


“पकडा पकडा... पळा लवकर...” गर्दी ओरडत होती.

“... सापडला वाटतं... गाड्यावर वडापाव खाऊन पैसे न देता तसाच पळत होता...”

“... घेऊन जा साहेब याला... चांगली थर्ड डिग्री दाखवा...”
.
.
.
.
.
“... सायेब, मारू नगा ओ... खरंच भूक लागली व्हती... नोकरी-धंदा देत नाय कोणच... मग पैसे कुठनं येणार..? पर मी ‘चोर न्हाई’..!

“... मोठा शहाणा आहेस रे तू... चोरी करून वर शहाणपणा शिकवतोस मला..? चांगला सोलून काढा रे याला...”
.
.
.
.
.
वातावरण शांत झाल्यावर साहेब टी. व्ही. लावतात...
“... ठळक बातम्या... लाखभर गुंतवणूकदारांचे ७५० कोटी रुपये बुडवणारा कार्तिक शहा फरार घोषित... क्रिकेट सट्टाप्रकरणातील तीन खेळाडूंची निर्दोष मुक्तता...”
.
.
.
.
.
“... मारू नका रे त्याला... सोडून द्या... ‘फक्त’ वीसच रूपयांची आहे त्याची भूक... तीही पोटाला ‘डंख मारणारी’..!

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ 
www.dramittukarampatil.blogspot.com 
www.trekdoctoramit.blogspot.com

Sunday, January 19, 2020

“बाबा, तुम्ही ‘जिवंत’ आहात!?” (Living humans, dead relations!)

“बाबा, तुम्ही ‘जिवंत’ आहात!?”
(जिवंत माणसं अन् मेलेली नाती)
(Living humans, dead relations!)
(ललित लेख १७; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)


छायाचित्र: निलेश; गुगल


गावी राहणारे आपले वडील निवर्तल्याचा फोन आला म्हणून बेंगलोरहून निघून घरी लगबगीने पोहोचलेला अनिल...





‘... बाबा गेलेत... पण, इथं तर ‘तसं’ काहीच वातावरण दिसत नाहीये..!?’





अचानक कोणीतरी त्याला हाक मारते.
.  
.  
.  
.  
.  
तो भांबावून, “... बाऽबाऽऽऽ, तुम्ही.!? ... तुम्ही ‘गेला’ असं समजलं; म्हणून...
.  
.  
.  
.   
.  
“... अंऽऽऽ... मीच सांगितलं होतं अद्वैतला ‘तसा’ फोन करायला... ... ...”

.  
.  
.  
.  
“... बाबाऽऽऽ, काय थट्टा लावलीय आमची ?”
.  
  
.  
.  
.  
“... थट्टा.!? काय करू मग, सांग ना... ... ... आठवड्यातून एखादा फोन आणि वर्षा-सहा महिन्यांतून एखादी भेट... ... ... बाकी, आम्ही जिवंत काय आणि मेलो काय..?”
.  
.  
.  
.  
.  
“... आमच्या भावना... आजारपणं... हव्या-नकोश्या गोष्टी... आनंद-दुःखं... सहन करतो रे; पणशेअर’ही करावसं वाटतं कुणाशीतरी... भेटावंसं वाटतं..!”
.  
.  
.  
.  
.  
“... म्हणूनच ‘ती’ बातमी..!”





“गंमताय ना, माणूस ‘जिवंत असताना मेलेली’ नाती तो ‘मरताच जिवंत’ होतात... ... !!!”


(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

Saturday, January 11, 2020

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे!!! (An unmatched philomthropist!!!)

‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे...
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे!!!’
(ललित लेख १६; © डॉ. अमित)



मार्च २०१७ मधील माझा ‘सिद्धगड’ ट्रेक...

गड चढाईला खूप उंच, कठीण आणि दिवसही उन्हाळ्याचे..!

गडमध्यावर ‘सिद्धगड’ गाव आहे. गावात फार तर २५ घरे... लहान, धाब्याची, कट्ट्यावर बांधलेली...

गावापासून जवळचे स्टँड आणि किराणा दुकान दहा किलोमीटरवर, तर जवळचा दवाखाना अकरा किलोमीटरवर...

रस्ता दाखवायला ‘स्वतःहून’ आलेल्या आजोबांशी बोलताना मी डॉक्टर असल्याचे त्यांना समजले... ते ऐकताच समोरच्या घरातील एक आजी बाहेर येऊन गुडघेदुखीवरच्या गोळ्या मागू लागल्या... गुडघे सुजून टम्म..!

‘थोड्या विचारांती’ माझ्याकडील पेनकिलरचे पाकीट मी त्यांना दिले.
.
.
.
.
.
गड फिरून सहा-सात तासांनी आम्ही परततो तर काय... पेरूच्या पानांचा चहा घेऊन आजी आमची वाट पाहत दारात उभ्या... फायद्या-तोट्याचा, होणाऱ्या त्रासाचा किंवा ओळखी-अनोळखीपणाचा कोणताही ‘विचार न करता’ !!!

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

Sunday, January 5, 2020

‘उंच’ शिखरावरचा ‘खुजा’ माणूस

‘‘उंच’ शिखरावरचा ‘खुजा’ माणूस’
(ललित लेख १५; © डॉ. अमित)

स्थळ: महाराष्ट्रातील ‘सर्वोच्च’ शिखर ‘कळसुबाई’
वेळ: २६ मार्च, २०१७ ची टळटळती दुपार!

मी तेथील एका बिस्किट विक्रेत्याच्या गोणपाटावर बसून त्याच्यासोबतच जेवतोय.

... तेवढ्यात एक उच्चशिक्षित ट्रेकर लागलेल्या भुकेमुळे आणि ‘वरती खायला इतर काहीच नसल्यामुळे’ बिस्किटे घ्यायला तिथे येतो.

“किती पुडे देऊ साहेब?”

“पाच...”

“हे घ्या, तीस रुपये...”

“तीस कसे, वीस ना? चार रुपये एमआरपी आहे एकाची... माहितीये ना?”

“साहेब, २० किमीवरून कच्च्या रस्त्याने आणायला लागतं हे... नंतर ५५०० फूट उंच भर उन्हात खांद्यावरून हे ओझे चढवावे लागते... खाली चारलाच विकतो आम्ही...

“ते मला नाही माहिती... वीस रुपये घेऊन गप्प बस, नाहीतर तक्रारच करतो तुझी.”

... तो तसाच उभा... पराभूत... निःशब्द... खुज्या विचारांच्या माणसांची ‘उंची’ मोजत..!

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ 
www.dramittukarampatil.blogspot.com 
www.trekdoctoramit.blogspot.com

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावध...