Sunday, July 26, 2020

व्यवस्था: व्हेंटिलेटरची की व्हेंटिलेटरवरची? (System: For ventilator or on ventilator?)

“व्यवस्था: व्हेंटिलेटरची की व्हेंटिलेटरवरची?”
(System: For ventilator or on ventilator?)

(ललित लेख ४५,
© डॉ. अमित)




प्रसंग १-
काहीही करा जोशी; पण व्हेंटिलेटर आले पाहिजेत... पेशंट किती वाढले आहेत बघा... ‘क्रिटिकल’ झालीये ‘सिच्युएशन’ एकदम... ‘कोटेशन’ मागवा... दोन-तीन कंपन्या आहेत बऱ्यापैकी काम करणाऱ्या,” अधिष्ठाता ‘सीएओं’ना* म्हणाले.

“सर, पण प्रशासकीय मंजुरी वगैरेला वेळ लागेल... कलेक्टर साहेबांनीही खर्चावर नियंत्रण ठेवायला सांगितले आहे मागील बैठकीत,” जोशी उत्तरले.

“मी बोलतो साहेबांशी... पेशंटचे जीव महत्त्वाचे आहेत की ‘प्रोसेस’ की खर्च,” डीन म्हणाले...


प्रसंग २-
“आज आपल्या शासकीय रुग्णालयात जे १० व्हेटिंलेटर आले आहेत त्यामुळे येथील जनतेला खूप फायदा होणार आहे. याकरिता आम्ही खूप प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांनीही जोर लावला,” उद्घाटनप्रसंगी लोकप्रतिनिधी म्हणाले.


प्रसंग ३-
वर्तमानपत्रातील बातमी-
व्हेंटिलेरच्या अनुपलब्धतेमुळे शासकीय रुग्णालयाच्या ‘अधिष्ठात्यां’चीच प्रकृती ढासळली... जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा... अधिष्ठात्यांंनाा स्वतःचेेच दुर्लक्ष भोवले...”
-------------------------------------------------------------------------------------
महत्त्वाचे शब्द-
सीएओ*= मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer)
अधिष्ठाता= डीन

-------------------------------------------------------------------------------------

(डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

Sunday, July 19, 2020

स्त्री-पुरूष समानतेची ऐशीतैशी..! (Gender equality: The novel way..!)

“स्त्री-पुरूष समानतेची ऐशीतैशी..!”
(Gender equality: The novel way..!)

(ललित लेख ४४,
© डॉ. अमित)




पर्मनंट वैद्यकीय अधिकारी म्हणून आदिवासी भागात झालेले पहिलेच पोस्टिंग... वेगळे लोक, वेगळी संस्कृती...

.

.

.

रात्रीच्या आठ वाजता क्वार्टरचा दरवाजा कोणीतरी वाजवला...

.

.

.

डोक्याला पट्टी बांधलेल्या आणि रक्ताळलेला शर्ट घातलेल्या आजोबांना बघताच मी गडबडीत पळतच पीएचसीत गेलो.

.

.

.

“घाबरू नका आजोबा, भूल देऊन टाके घालू... आणि दोन इंजेक्शन... झालं मग... दहा मिनिटाचं काम...”

.

.

.

“पर, त्यच्यासाटी नाय आलोय म्याहयान¹¹... पयल्यांदा केस कर... डोखरी¹ लई मांजली²...”

.

.

.

“दाक्टर, हिकडं नांग³... रोज रातीला⁴ कुटतंय⁵ मह्यंला... मह्यला⁶ बरडेव⁷, डोकीत⁸ मारतंय ह्यो वाडघोबास⁹... मांग¹⁰  म्याहयान¹¹ कुटलं...” मागून येऊन आजी म्हणाली.

.

.

.

“कायंबी सांगताव¹² का दाक्टरला, डोखरे..?”

.

.

.

आजी, तुम्ही दारू पिलाय?” मी...

.

.

.

“व्हय, मांग आमी डोखरा-डोखरी रोज पिताव... कुटतो बी रोज एकमेकायले¹³...
____________________________________________________________

(वरील लेखात वारली भाषेचा मी वापर केला आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर प्रामुख्याने राहणाऱ्या वारली आदिवासींची ही बोलीभाषा आहे.)

(वारली शब्दार्थ-
¹= म्हातारी (डोखरा= म्हातारा)
²= गर्व होते
³= बघ
⁴= रात्री
⁵= मारणे
⁶= मला
⁷= पाठीवर
⁸= डोक्यात
⁹= म्हातारा
¹⁰= मग
¹¹= मी
¹²= सांगतेस
¹³= एकमेकांना)


अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com


Sunday, July 12, 2020

“भडका: स्टोव्हचा... की, नात्यांचा..?” (The blown up relations...)

“भडका: स्टोव्हचा... की, नात्यांचा..?”
(The blown up relations...)

(ललित लेख ४२,
© डॉ. अमित)




एम. बी. बी. एस.ला असताना ‘शल्यचिकित्सा’ विभागातील ‘जळीतकक्षा’तील* पहिलाच दिवस!
.
.
.

९०% भाजलेल्या एका महिलारुग्णाचा पोलिस जबाब घेतायंत...
.
.
.

“ताई, नीट सविस्तर सांग काय ते... सासरचे जाच करत होते का..?” महिला पी. एस. आय. म्हणाल्या.
.
.
.

“नाही, नाही... खूप चांगली माणसं आहेत हो ती... सासू-सासरे तर माई-आण्णांसारखे प्रेम करतात माझ्यावर... नवरा तर इतके लाड करतो की...”
.
.
.

“मग नक्की झालं काय?”
.
.
.

“काही नाही मॅडम, स्वयंपाकाला घेतलं होतं सकाळी... काही केल्या स्टोव्ह पेटतच नव्हता... प्रेशर वाढवले... काडी पेटवली... तर अचानक स्फोटच झाला... नंतरचं काहीच आठवत नाही...”
.
.
.

“नंतरचं..? म्हणजे, आधीचं नीट आठवतंय तुला...”
.
.
.

“हो... क्का, काय झालं..?”
.
.
.

“ताई, स्टोव्ह नव्हता तुझ्या घरी... कधीच!!! झडती-जबाब झालेत आमचे... ... मरणाच्या दारात तरी निदान खरं बोलायचंस..!”


*= Burn Ward


अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

Sunday, July 5, 2020

कधी वकील आणि कधी न्यायाधीश! (An advocate and a judge!)

कधी वकील आणि कधी न्यायाधीश!
(An advocate and a judge!)

(ललित लेख ४१,
© डॉ. अमित)




✓ प्रसंग-१

“... ट्रिपल सीट फिरतात काय? लायसन्स काढून घ्या तिघांचे पण... आणि, ऐकत नसतील तर सरळ केस करा...”

“साहेब, ‘मित्र अपघातात सीरियस झालाय म्हणून निघालो होतो’ म्हणतात... एकजण तर म्हणतो, ‘माझे वडीलच ‘इनचार्ज’ आहेत इथले, मला भेटू द्या त्यांना’ ...”

“साबळे, त्यांच्या कथा काय ऐकताय? ठोकून काढा तिघांना पण... चांगली अद्दल घडवा...”



✓ प्रसंग-२

“साबळे, काय म्हणतायंत ते तिघे? घरी फोन लावले का त्यांच्या?”

“बापरे... मुलाचे २२ मिस्डकॉल..? मीटिंगमध्ये फोन ‘सायलंट’ असल्यामुळे लक्षात आले नाही माझ्या...”

“हे काय, रिंग तर इथेच वाजतेय...”

“साहेब, ‘त्या तिघांत’ तुमचाही मुलगा आहे... तोच फोन करत होता तुम्हाला...”

“साबळे, तुम्ही माझ्या मुलाला पकडलंय... काही अक्कल वगैरे? सोडा त्या सगळ्यांना आधी...




अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावध...