Sunday, May 31, 2020

संदिग्धता (भाग १) The dilemma (Part 1)

संदिग्धता (The Dilemma)

(© डॉ. अमित,
ललित लेख ३६)



✓ प्रसंग १-
“डॉक्टर, कसे आहेत रिपोर्ट्स? अहो, गेली सतरा वर्षे बाळाची वाट बघतोय आम्ही... बाळ होत नसल्यामुळे काय काय सहन नाही केलं मी... बाहेरच्यांचे टोमणे, घरी सासू-नणंदेचा ‘जाच’... जाऊदे... सांगा ना लवकर, सर...” आरती म्हणाली.

“हो, समजू शकतो... जग असंच असतं” डॉक्टर म्हणाले, “पण निराश होऊ नका... आज ‘गूडन्यूज’ आहे तुमच्यासाठी... Time to Celebrate..!”


✓ प्रसंग २-
घरी आल्यावर पाहते तर काय, घरी मोठा आक्रोश सुरू आहे... सगळे रडताहेत...
“अहो आई, काय झालं? नणंदबाई, तुम्ही तरी बोला की...”
.
.
.
“अगं काय बोलू? माझा एकुलता एक लाडका लेक सोडून गेला गं आपल्याला... शाळेतून येताना ट्रकने उडवलं त्याला... आता कुणाकडे बघू मी..?”


✓ प्रसंग ३-
.
.
.
कसं ‘रिअॅक्ट व्हावं आरतीने..? काय वाटतं तुम्हाला?”



(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी‌. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.trekdoctoramit.blogspot.com

Sunday, May 24, 2020

टू बी ऑर नॉट टू बी... (To be or not to be)

“टू बी ऑर नॉट टू बी...”
(© डॉ. अमित,
ललित लेख ३५)




✓ भाग १-

पास दाखवूनही तलाठी ‘कोरोना’च्या भीतीने संजयला गावात घेईना, तेव्हा त्याने सरपंच असलेला त्याचा मित्र पोपट याला फोन केला.
.
.
.

✓ भाग २-

“नाय बा संजू... लोकं ठोकतील मला... मी आत्ता तुला काईच मदत करू शकत नाही... नाईलाज हाय माजा...”
.
.
.
“पोपट, अरे काय हे? इतक्यात विसरलास? मागच्या पुरात तुझं घर जमीनदोस्त झालं तेव्हा मी तुला लाखभर रुपये न मागता दिले होते... फक्त मैत्रीसाठी... आणि आता तू..?” संजय म्हणाला.
.
.
.
“तुजं पैसं दोन म्हैन्यात देतो... इतकं काय बोलून दाखवाय नगं... मी कुटं तुज्याकडं मागाय आलतो? तूच ठिऊन गेल्तास...”
.
.
.
“म्हणजे, मदत करून मीच चुकलो आणि आता मला गरज आहे तर...”
.
.
.
“ते तुजं तू ठरव... आता मातूर गावात यिऊ नगंस...”
 

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.trekdoctoramit.blogspot.com

Sunday, May 17, 2020

“हत्या... की, आत्महत्या..?” (A cold blooded murder... or the suicide..?”

“हत्या की आत्महत्या?”
(ललित लेख ३४,
© डॉ. अमित)

Add caption


भाग १-

 “असे कसे रुळावर झोपता तुम्ही? थोडीतरी अक्कल-बिक्कल..?” पोलिस अधिकारी खेकसला.
.
.
.
“रुळावर झोपलात ते झोपलात... रेल्वेचा एवढा मोठा आवाज नाही आला कारे तुम्हाला..? बेशुद्ध पडला होता का..? आता द्या यांना लाखांत नुकसानभरपाई..,” रेल्वेचा अधिकारी ओरडला.
.
.
.
“तुमच्या घरातले आठ लोक गेले, काय वाटतंय? प्रवास ‘असा’ संपेल असं कधी वाटलं होतं?” पत्रकारांची मुलाखत...
.
.
.
“×××, गरीब झाले तर काय उपकार करतात का आमच्यावर? लुटा आता आम्ही ‘प्रामाणिक’पणे भरलेल्या टॅक्सचे पैसे आणि मारा मजा..!” उच्चमध्यमवर्गीय घरातील चर्चा...
.
.
.

✓ भाग २-

“का वाचवलंस देवा मला..? कशाची ही शिक्षा..? जमंल तसं कष्ट केलं की... किती दिवस बायकापोरांना उपाशी ठेऊ..? बरं झालं त्यांना सोडवलंस..!” शून्यात नजर लावून सिस्टीमने ‘जिवंत’पणी ‘मारलेला’ मजूर म्हणाला...


(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
(केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५)
www.trekdoctoramit.blogspot.com

Sunday, May 10, 2020

मरणाचा चॉईस... (The choice of death...)

“मरणाचा चॉईस”
(ललित लेख ३३,
© डॉ. अमित)

* तळटीप

स्टेशनात विश्रांती घेणारे मालगाडीचे इंजिन शेजारच्या इंजिनाला म्हणाले, “माझी चाकं धुऊन मी केलेलं पाप जाणाराय का? धुवायचं सोड; ते लपवता तरी येणारंय का?”
.
.
.

“... आपण माणसं थोडीच आहोत; गंगेच्या पाण्यात डुबकी मारून ‘केलेली’ पापं ‘धुवायला’..?”
.
.
.

दुसरे इंजिन बिथरून म्हणाले, “झालंय काय तुला आज? चक्क ‘माणसा’सारख्या पापपुण्याच्या गोष्टी करतोयंस..!”
.
.
.

“... काय करू मग, सांग ना... काल ‘त्या’ गोरगरिबांना मी चाकाखाली चिरडले... रक्तामासांने भिजलो... ‘घामा’ने दरवळलो... चाकं धुतली; पण, झालेल्या पापाचं..?”
.
.
.

“... कसलं पाप? उलट जीवन‘चक्रा’तून ‘सोडवलंस’ तू त्यांना... आजाराने नाहीतर भुकेने; मरणारच होते ते... आणि, मरायचा तरी ‘चॉईस’ कुठंय गरिबांना..! जिवंतपणी कुणी विचारपूस केली त्यांची, जी आत्ता होणाराय?”
.
.
.
“... माणसं नाही रे; माणुसकीच मेलीय चाकांखाली..!”


(* तळटीप- सदर चित्र हे मी फेसबुकवरून डाउनलोड केले असून ते बनविणाऱ्याचे नाव मला सापडले नाही. चित्राचे संपूर्ण क्रेडिट हे संबंधित चित्रकाराचेच आहे.)

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
(केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५)
www.trekdoctoramit.blogspot.com

Saturday, May 2, 2020

तेरावं..! (The post death, but very late rituals..!)

“तेरावं..!”
(ललित लेख ३२;
© डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story




“काका, १०० किलो तांदूळ, ५० किलो डाळ, मीठ मसाला... लागतं ते सगळं द्या... वडिलांचं तेरावं मोठं करायचंय... तेवढीच त्यांच्या आत्म्याला शांतता...”

“बाळू, पाण्याचं बघ... एखादा टँकर वगैरे... आणि, उन्हं कडक आहेत... मांडवाचंही...”
.
.
.
.
.
“तुमचे वडील यायचे आमच्या दुकानात... तुम्ही लहान असताना दर रविवारी ठरल्याप्रमाणे गोड शेव, जिलेबी आणि हां, छोटी खारीची बिस्किटे खास ‘माझ्या दाद्यासाठी’ म्हणून, म्हणजे तुमच्यासाठी न्यायचे,” दुकानदार म्हणाला...
.
.
.
.
.
“... पण, दोन महिन्यांपूर्वी आले तेव्हा बरे नव्हते; हाडांची पार काडं झाली होती... ‘पुतण्याची बायको पण आता रोज जेवायला वाढत नाही; पोरांचा तर पत्ताच नाही’ म्हणाले...”
.
.
.
“ माफ करा; पण ‘भूकेनेच व्याकुळ होऊन गेले’ म्हणातयंत लोक... तुम्ही ‘थोडं लवकर’ यायला हवं होतं, नाही!!! ”


(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५


“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावध...