Saturday, September 12, 2020

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!”

(सापेक्षतावाद आणि समाधान)


(ललित लेख ४५,
© डॉ. अमित)




प्रसंग- १
सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो.

‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावधीत पगार घेणारे ‘सीईओ’ नेमले जातात तेव्हा त्यांना मुलाखतीत नेमके काय प्रश्न विचारले जातात’ याबद्दल सद्गुरुंच्या मनात असणाऱ्या कुतुहलापोटी त्यांनी एका बड्या ‘एचआर’ला विचारले.

बरीच उत्कंठा वाढवून एचआर म्हणाले, “आम्ही त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या अपयशाबद्दल आणि त्यातून ते कसे बाहेर पडले याबद्दल विचारतो.”
.
.
.
मला त्यानंतर उगाचच अपयशी असल्यासारखे वाटून मी खिन्न झालो.
.
.
.
प्रसंग- २
रात्री आई फोनवर माझ्याशी बोलत होती, “अरे, माझी एक जुनी मैत्रीण आज भेटली होती... तू स्वतःहून आदिवासी भागात सेवा देऊन आणि इतक्या अडचणींवर मात करून ‘एमडी’ला ॲडमिशन मिळवलंस याचं तिला इतकं कौतुक वाटलं की, विचारूच नकोस...”
.
.
.
... अरेच्चा!  मीही तर ‘सुंदर पिचाईच’ होतो की..!

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावध...