Sunday, September 29, 2019

“त्याआदीच मी मेली व्हती!” (Long back had I died..!)

“त्याआदीच मी मेली व्हती!”

(ललित लेख २)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)

अंगावरच्या वल्या हिरव्या साडी-चोळीवर मी सरकारी दवाखान्यातल्या खाटंवर निपचित पडून हाय. तितली डाक्टर, सिस्टर लोगं मला “वाचवायला” धावपळ करताना दिसत्यात. डाक्टर मला तपासून सिस्टरला म्हटलं, “पेशंटचं रिदयाचं ठोकं लागत न्हाईत” आणि मला कुठलं तरी इन्जक्शन द्यायला सांगितलं. तवर सलाईनबी लावली हुती तिनं.
माज्याबरुबर शे-दोनशे माणसं आल्ती. डाक्टरनं घरच्यांना इचारलं, “काय झाल्तं हिला?”... “पाट्च्याला हिरीला गेल्ती तवा पाण्यात पडली; चुलीवरचा भात अजून तसाच शिजत हुता” न्हवऱ्यानं सांगितलं...
“मिल्या ही”, गर्दीतनं कोणतरी म्हंटलं... लग्नानंतर बारा-तेरा वर्सात चार पोरीच झाल्या, पोरगं न्हवतं म्हूण तेवडी वर्सं सासरच्यांचा मार खाल्ला. पाचवं ‘पोरगं’ झालं तवा कुटं मार सोडून दोन येळचं खायाला मिळालं; पर “त्याआदीच मी मेली व्हती!”

साभार: गुगल


(सदर लघुकथा ही मी कोल्हापूर जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असताना घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे.)
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र),
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

ऑफ-रोड (Off-road)

“ऑफ-रोड”
(ललित लेख, © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा) (#100_word_story)

यावर्षीच्या सुरुवातीला आम्ही आमच्यासाठी चारचाकी गाडी घ्यायचे ठरविले. कोणती गाडी घ्यावी याच्यावर तेव्हाच नव्हे तर त्यापूर्वीही घरी बराच खल झाला होता. विचाराअंती ‘स्पोर्ट्स यूटिलिटी वेईकल (SUV)’ प्रकारातील गाडी घेण्याचे निश्चित झाले. एका कंपनीची गाडी आमच्या पसंतीस पडली. मात्र चौकशीअंती, त्या गाडीला ‘ऑटोमॅटिक मोड’ नसल्याचे आम्हाला समजले. आम्ही निराश झालो. त्याच्याकडे आमच्या प्रश्नाचे उत्तर नसणार आहे हे माहिती असूनही मी त्या विक्रेत्याला म्हटले, “गाडी छानच आहे; पण तिला ऑटो-मोड हवा होता.” त्यावर तो उत्तरला, “सर, तुम्ही ज्याअर्थी एसयूव्ही घेताय त्याअर्थी तुम्हाला ‘ऑफ-रोड’ फिरायला आवडत असणार. मग, तुम्ही ‘ऑटो-मोड’ घेऊच नका. खराब रस्त्यांवर संपूर्ण नियंत्रण तुमचेच हवे; रस्त्यांनी किंवा वाहनाने तुम्हाला नियंत्रणात ठेऊ नये.”



(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र २))

www.dramittukarampatil.blogspot.in www.trekdoctoramit.blogspot.in

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावध...