“ऑफ-रोड”
(ललित लेख, © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा) (#100_word_story)
(ललित लेख, © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा) (#100_word_story)
यावर्षीच्या सुरुवातीला आम्ही आमच्यासाठी चारचाकी गाडी घ्यायचे ठरविले. कोणती गाडी घ्यावी याच्यावर तेव्हाच नव्हे तर त्यापूर्वीही घरी बराच खल झाला होता. विचाराअंती ‘स्पोर्ट्स यूटिलिटी वेईकल (SUV)’ प्रकारातील गाडी घेण्याचे निश्चित झाले.
एका कंपनीची गाडी आमच्या पसंतीस पडली. मात्र चौकशीअंती, त्या गाडीला ‘ऑटोमॅटिक मोड’ नसल्याचे आम्हाला समजले. आम्ही निराश झालो. त्याच्याकडे आमच्या प्रश्नाचे उत्तर नसणार आहे हे माहिती असूनही मी त्या विक्रेत्याला म्हटले, “गाडी छानच आहे; पण तिला ऑटो-मोड हवा होता.” त्यावर तो उत्तरला, “सर, तुम्ही ज्याअर्थी एसयूव्ही घेताय त्याअर्थी तुम्हाला ‘ऑफ-रोड’ फिरायला आवडत असणार. मग, तुम्ही ‘ऑटो-मोड’ घेऊच नका. खराब रस्त्यांवर संपूर्ण नियंत्रण तुमचेच हवे; रस्त्यांनी किंवा वाहनाने तुम्हाला नियंत्रणात ठेऊ नये.”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र २))
www.dramittukarampatil.blogspot.in
www.trekdoctoramit.blogspot.in

Comments
Post a Comment