“मरणाचा चॉईस”
(ललित लेख ३३,
© डॉ. अमित)
स्टेशनात विश्रांती घेणारे मालगाडीचे इंजिन शेजारच्या इंजिनाला म्हणाले, “माझी चाकं धुऊन मी केलेलं पाप जाणाराय का? धुवायचं सोड; ते लपवता तरी येणारंय का?”
.
.
.
“... आपण माणसं थोडीच आहोत; गंगेच्या पाण्यात डुबकी मारून ‘केलेली’ पापं ‘धुवायला’..?”
.
.
.
दुसरे इंजिन बिथरून म्हणाले, “झालंय काय तुला आज? चक्क ‘माणसा’सारख्या पापपुण्याच्या गोष्टी करतोयंस..!”
.
.
.
“... काय करू मग, सांग ना... काल ‘त्या’ गोरगरिबांना मी चाकाखाली चिरडले... रक्तामासांने भिजलो... ‘घामा’ने दरवळलो... चाकं धुतली; पण, झालेल्या पापाचं..?”
.
.
.
“... कसलं पाप? उलट जीवन‘चक्रा’तून ‘सोडवलंस’ तू त्यांना... आजाराने नाहीतर भुकेने; मरणारच होते ते... आणि, मरायचा तरी ‘चॉईस’ कुठंय गरिबांना..! जिवंतपणी कुणी विचारपूस केली त्यांची, जी आत्ता होणाराय?”
.
.
.
“... माणसं नाही रे; माणुसकीच मेलीय चाकांखाली..!”
(* तळटीप- सदर चित्र हे मी फेसबुकवरून डाउनलोड केले असून ते बनविणाऱ्याचे नाव मला सापडले नाही. चित्राचे संपूर्ण क्रेडिट हे संबंधित चित्रकाराचेच आहे.)
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
(केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५)
www.trekdoctoramit.blogspot.com
अप्रतिम सर
ReplyDeleteखूप भयंकर अंत झाला त्या बिचाऱ्या मजुरांचा, खूप हळहळ वाटते असं काही ऐकलं की कोणीतरी म्हणत त्यांच मरणच आलं असेल पण ते असं? कदाचित त्यांनी कोरोनाला आणि उपासमारील हुलकावणी दिली म्हणून नियतीने असा घात तर केला नाही ना !
ReplyDeleteBest
ReplyDeleteखुप छाण लिहील सर दारक सत्य परसस्थिती
ReplyDeletePhotograph far chan ahe truth of life
ReplyDeleteमस्त लेखनी
ReplyDeleteपोट भरण्यासाठी करावी लागणारी आटापीटा त्याच्या कडे पाहणाचा इतरांचा दृ ष्टिकोन.भावनाशुन्य समाज.
ReplyDelete