Skip to main content

तेरावं..! (Post death late rituals..!)

“तेरावं..!”
(ललित लेख ३२;
© डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story




“काका, १०० किलो तांदूळ, ५० किलो डाळ, मीठ मसाला... लागतं ते सगळं द्या... वडिलांचं तेरावं मोठं करायचंय... तेवढीच त्यांच्या आत्म्याला शांतता...”

“बाळू, पाण्याचं बघ... एखादा टँकर वगैरे... आणि, उन्हं कडक आहेत... मांडवाचंही...”
.
.
.
.
.
“तुमचे वडील यायचे आमच्या दुकानात... तुम्ही लहान असताना दर रविवारी ठरल्याप्रमाणे गोड शेव, जिलेबी आणि हां, छोटी खारीची बिस्किटे खास ‘माझ्या दाद्यासाठी’ म्हणून, म्हणजे तुमच्यासाठी न्यायचे,” दुकानदार म्हणाला...
.
.
.
.
.
“... पण, दोन महिन्यांपूर्वी आले तेव्हा बरे नव्हते; हाडांची पार काडं झाली होती... ‘पुतण्याची बायको पण आता रोज जेवायला वाढत नाही; पोरांचा तर पत्ताच नाही’ म्हणाले...”
.
.
.
“ माफ करा; पण ‘भूकेनेच व्याकुळ होऊन गेले’ म्हणातयंत लोक... तुम्ही ‘थोडं लवकर’ यायला हवं होतं, नाही!!! ”


(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५


Comments

Post a Comment