Sunday, June 28, 2020

दुटप्पीपणा (भाग ३) Hypocrisy (Part 3)

दुटप्पीपणा (भाग ३)
Hypocrisy (Part 3)

(ललित लेख ४०,
© डॉ. अमित)




‘विशेष निधी’चे वाटप झाल्यानंतरची जिल्ह्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याची बैठक...
.
.
.

“हे बघा, अॅम्ब्युलन्सच्या डागडुजीसाठी प्रत्येकी दहा हजारांचा निधी आला आहे... इतके काही लागत नसतातच... पाच-पाच हजार ‘वळते’ करा... ‘समझनेवालों को..!’
.
.
.

“पण, सर, आमची अँब्युलन्स खूपच खराब आहे. तीस हजार तरी लागतील म्हणतो इंजिनीअर... गावात दुसरी गाडी नाही..

“तुम्ही नवीन आहात खात्यात... ‘समजेल’ हळूहळू... खूप विचार करू नका गावाचा”

“सर, मागच्या महिन्यात एक गरोदर माता मृत्यूमुखी पडली... गाडी चालूच झाली नाही आमची शेवटपर्यंत... दवाखान्याजवळच तडफडून मेली बिचारी...”

“मूर्ख आहात का तुम्ही? तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही हे सगळं? बसा गप्प... पैसे पाठवा इकडे आणि जा समाजसेवा करायला... ‘वर’पर्यंत सगळ्यांना ‘सांभाळावं लागतं’ मला...”



अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

Sunday, June 21, 2020

दुटप्पीपणा (भाग २) Hypocrisy (Part 2)

दुटप्पीपणा (भाग २)
Hypocrisy (Part 2)

(ललित लेख ३९,
© डॉ. अमित)




नक्षलग्रस्त भागातील सुदूर असणारे एक कार्यालय...
आदल्या रात्री वरिष्ठांचा कर्तव्यावरील अधिकाऱ्याला फोन येतो.

“उद्या आपल्या डिपार्टमेंटच्या सचिव मॅडम येणार आहेत ‘व्हिजिट’ला. ‘व्यवस्था’ चोख ठेवा. मागच्या वेळी एकाला ‘सस्पेंड’ केलं होतं बाईंनी.”

“बोरसे ना? त्यांचा तर मॅडमच्याच हस्ते ‘उत्कृष्ट कामा’साठी सत्कार झाला होता... तरीही... चुकीचाय ना हे...”

“जाऊ द्याऽऽऽ... चालायचंच... तुम्ही उद्याचं बघा...”


दुसऱ्या दिवशी...

मॅडम म्हणतात, “तुमचं कौतुक आहे. तुम्ही इतक्या दुर्गम भागात राहून काम करता. जेवणाची वगैरे काय व्यवस्था इथे?”

“इथे काहीच उपलब्ध नाही मॅडम... जवळचं हॉटेल ३० किलोमीटरवर आहे...”

“अरे बापरे! अवघडच आहे...”

“हो, मॅडम...”

ते जाऊदे... आमच्या आजच्या सरबराईचं काय? २५-३० लोक आहेत बरोबर... ‘सीआर’* चांगला हवाय ना.




*सी.आर.- (अधिकाऱ्यांच्या वर्षभरातील कामाचा) गोपनीय अहवाल; हा वरिष्ठांनी गोपनीयपणे लिहायचा असतो.



अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

Saturday, June 13, 2020

दुटप्पीपणा (भाग १) Hypocrisy (Part 1)

दुटप्पीपणा (भाग १)
Hypocrisy (Part 1)

(ललित लेख ३८,
© डॉ. अमित)



✓ प्रसंग १-
महाराष्ट्रातील एका कुपोषणग्रस्त जिल्ह्यातील एक उच्चस्तरीय शासकीय बैठक...

“डॉक्टर, तुमचं काम कुपोषित बालकांवर उपचार करण्याचे आहे...  अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून त्यांचा आकडा ‘ठरवू’ आम्ही; तुमची ढवळाढवळ नको आहे आकडेवारीत... समजलं?”

“पण सर, ‘तज्ज्ञ’ तर आम्ही आहोत ना... सेविकांचे आकडे कसे खरे मानायचे? त्यांच्या रिपोर्टपेक्षा आकडा कितीतरी मोठा आहे...”

“डॉक्टर, खाली बसा गप्प... आम्ही ठरवू काय ते...”


✓ प्रसंग २- 
एका मोठ्या वृत्तवाहिनीचा ‘ग्राउंड रिपोर्ट’...
“ ××× तालुका सर्वाधिक कुपोषणग्रस्त... कुपोषित बालकांचा आकडा अधिकाऱ्यांनी दाबला... शासनाची दिशाभूल...”


✓ प्रसंग ३-
“कोण डॉक्टर आहे त्या भागात? ‘शो-कॉज’* काढा...”

“पण सर, ते मागच्या मीटिंगलाच सांगत होते, आकडा मोठा आहे म्हणून... तुम्हीच त्यांना गप्प बसवलं...”

“... तुमचा शहाणपणा नकोय आता... चौकशी होईपर्यंत निलंबित करा त्यांना...”

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 
*शो-कॉज= कारणे दाखवा नोटिस


(डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.trekdoctoramit.blogspot.com

Sunday, June 7, 2020

“टू बी ऑर नॉट टू बी...” (To be or not to be...) (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2)

“टू बी ऑर नॉट टू बी...”
(संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2)
(© डॉ. अमित,
ललित लेख ३७)




✓ प्रसंग १-
“कशाला एवढं ‘टेन्शन’ घेताय, सर? लाख-दोनलाख घ्या आणि करून टाका सही... तुम्हाला नको असतील तर ‘वर-खाली’ वाटून टाका...”

“जोशी, फार बोलू नका... सेक्रेटरी आहात, सेक्रेटरीसारखे रहा... मला माहितीये ‘काय बरोबर, काय चूक’ ते...”

“... साहेऽब, माझेही केस उगाच नाही पांढरे झाले... तुम्ही कालपरवाचे... तुमच्या भल्याचंच सांगतोय... बघा ‘वरून’ फोन येतो की नाही ते...”


✓ प्रसंग २-
साहेबांना त्यांच्या साहेबांचा फोन येतो...
“संदीप, तुला माहितीये, दरवर्षी १००-१२५ लोक आयएएस होतात... तू काही एकटाच नाहीस... मर्यादेत रहा... रहेजाच्या फाईलवर सही करून टाक... आदेश समज हवंतर...”

“... पण, सर..,” फोन कट होतो...


✓ प्रसंग ३-
“काय करू मी..? माझे संस्कार, तत्त्वं, स्वच्छ चारित्र्याची तळमळ, गरिबांना न्याय... सगळं एकदम पाण्यात..!


(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावध...