Skip to main content

“त्याआदीच मी मेली व्हती!” (Long back had I died..!)

“त्याआदीच मी मेली व्हती!”

(ललित लेख २)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)

अंगावरच्या वल्या हिरव्या साडी-चोळीवर मी सरकारी दवाखान्यातल्या खाटंवर निपचित पडून हाय. तितली डाक्टर, सिस्टर लोगं मला “वाचवायला” धावपळ करताना दिसत्यात. डाक्टर मला तपासून सिस्टरला म्हटला, “पेशंटचं ठोकं लागत न्हाईत” आणि मला कुठलं तरी इन्जक्शन द्यायला सांगितलं. तवर सलाईनबी लावली हुती तिनं.

माज्याबरुबर शे-दोनशे माणसं आल्ती. डाक्टरनं घरच्यांना इचारलं, “काय झाल्तं हिला?”... “पाट्च्याला हिरीला गेल्ती तवा पाण्यात पडली; चुलीवरचा भात अजून तसाच शिजत हुता” न्हवऱ्यानं सांगितलं...
“मेल्या ही”, गर्दीतनं कोणतरी म्हंटलं...

लग्नानंतर बारा-तेरा वर्सात चार पोरीच झाल्या, पोरगं न्हवतं म्हूण तेवडी वर्सं सासरच्यांचा मार खाल्ला. पाचवं ‘पोरगं’ झालं तवा कुटं मार सोडून दोन येळचं खायाला मिळालं; पर “त्याआदीच मी मेली व्हती!”

साभार: गुगल


(सदर लघुकथा ही मी कोल्हापूर जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असताना घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे.)
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र),
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..!

संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..! पहाटे ‘जॉगिंग’साठी करूळ घाटात गेलो होतो. घाटाच्या मध्यावर एक ऊसाचा ट्रक उलटलेला दिसला. “कुणाला लागलं आहे का?” तिथे बसलेल्या शेतकऱ्याला मी विचारले. “न्हाई, सायेब... मेलो असतो तर चाललं असतं... ऊस पण गेला आन् गाडी पण गेली,” तो. “काही मदत हवी असेल तर सांगा,” मी. फिरून परत येईपर्यंत शेतकऱ्याच्या घरची माणसं तिथे पोहोचली होती. ‘वरसाची कमाई पाण्यात गेली’ म्हणून ती मोठमोठ्यानं रडत होती. . . . त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारमधून एक स्त्री खाली उतरून शेतकऱ्याला म्हणाली, “थोडा ऊस द्या की... संक्रातीला पूजा करायला पाहिजेत.” “परसंग काय आन् तुमचं काय, ताई?! घ्या ऊस... पर हे ऐकण्यापेक्षा मी मेलो असतो तर..,” आशाळभूत शेतकरी हतबलपणे म्हणाला. (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम.बी.बी.एस.,एम.डी. (बालरोग)) (© सदर लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन आहेत.) (सदर लेखकाचा दुसरा वाचनीय ब्लॉग- www. dramittukarampatil.blogspot.com )

मरणाचा चॉईस... (The choice of death...)

“मरणाचा चॉईस” (ललित लेख ३३, © डॉ. अमित) * तळटीप स्टेशनात विश्रांती घेणारे मालगाडीचे इंजिन शेजारच्या इंजिनाला म्हणाले, “माझी चाकं धुऊन मी केलेलं पाप जाणाराय का? धुवायचं सोड; ते लपवता तरी येणारंय का?” . . . “... आपण माणसं थोडीच आहोत; गंगेच्या पाण्यात डुबकी मारून ‘केलेली’ पापं ‘धुवायला’..?” . . . दुसरे इंजिन बिथरून म्हणाले, “झालंय काय तुला आज? चक्क ‘माणसा’सारख्या पापपुण्याच्या गोष्टी करतोयंस..!” . . . “... काय करू मग, सांग ना... काल ‘त्या’ गोरगरिबांना मी चाकाखाली चिरडले... रक्तामासांने भिजलो... ‘घामा’ने दरवळलो... चाकं धुतली; पण, झालेल्या पापाचं..?” . . . “... कसलं पाप? उलट जीवन‘चक्रा’तून ‘सोडवलंस’ तू त्यांना... आजाराने नाहीतर भुकेने; मरणारच होते ते... आणि, मरायचा तरी ‘चॉईस’ कुठंय गरिबांना..! जिवंतपणी कुणी विचारपूस केली त्यांची, जी आत्ता होणाराय?” . . . “... माणसं नाही रे; माणुसकीच मेलीय चाकांखाली..!” (* तळटीप- सदर चित्र हे मी फेसबुकवरून डाउनलोड केले असून ते बनविणाऱ्याचे नाव मला सापडले नाही. चित्राचे संपूर्ण क्रेडिट हे संबंधित चित्रकाराचेच आहे.) (...

“टू बी ऑर नॉट टू बी...” (To be or not to be...) (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2)

“टू बी ऑर नॉट टू बी...” (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2) (© डॉ. अमित, ललित लेख ३७) ✓ प्रसंग १- “कशाला एवढं ‘टेन्शन’ घेताय, सर? लाख-दोनलाख घ्या आणि करून टाका सही... तुम्हाला नको असतील तर ‘वर-खाली’ वाटून टाका...” “जोशी, फार बोलू नका... सेक्रेटरी आहात, सेक्रेटरीसारखे रहा... मला माहितीये ‘काय बरोबर, काय चूक’ ते...” “... साहेऽब, माझेही केस उगाच नाही पांढरे झाले... तुम्ही कालपरवाचे... तुमच्या भल्याचंच सांगतोय... बघा ‘वरून’ फोन येतो की नाही ते...” ✓ प्रसंग २- साहेबांना त्यांच्या साहेबांचा फोन येतो... “संदीप, तुला माहितीये, दरवर्षी १००-१२५ लोक आयएएस होतात... तू काही एकटाच नाहीस... मर्यादेत रहा... रहेजाच्या फाईलवर सही करून टाक... आदेश समज हवंतर...” “... पण, सर..,” फोन कट होतो... ✓ प्रसंग ३- “काय करू मी..? माझे संस्कार, तत्त्वं, स्वच्छ चारित्र्याची तळमळ, गरिबांना न्याय... सगळं एकदम पाण्यात..! ” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot.com www.trekdoctoramit.blogspot.com