संदिग्धता (The Dilemma)
(© डॉ. अमित,
ललित लेख ३६)
✓ प्रसंग १-
“डॉक्टर, कसे आहेत रिपोर्ट्स? अहो, गेली सतरा वर्षे बाळाची वाट बघतोय आम्ही... बाळ होत नसल्यामुळे काय काय सहन नाही केलं मी... बाहेरच्यांचे टोमणे, घरी सासू-नणंदेचा ‘जाच’... जाऊदे... सांगा ना लवकर, सर...” आरती म्हणाली.
“हो, समजू शकतो... जग असंच असतं” डॉक्टर म्हणाले, “पण निराश होऊ नका... आज ‘गूडन्यूज’ आहे तुमच्यासाठी... Time to Celebrate..!”
✓ प्रसंग २-
घरी आल्यावर पाहते तर काय, घरी मोठा आक्रोश सुरू आहे... सगळे रडताहेत...
“अहो आई, काय झालं? नणंदबाई, तुम्ही तरी बोला की...”
.
.
.
“अगं काय बोलू? माझा एकुलता एक लाडका लेक सोडून गेला गं आपल्याला... शाळेतून येताना ट्रकने उडवलं त्याला... आता कुणाकडे बघू मी..?”
✓ प्रसंग ३-
.
.
.
कसं ‘रिअॅक्ट व्हावं आरतीने..? काय वाटतं तुम्हाला?”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.trekdoctoramit.blogspot.com

आरतीने गोड बातमीने मनातून कितीही खुष असली तरीही ती त्या कुटुंबिक परिस्थितीत प्रचंड दुःखी होईल आणि हीच तिची साधारण reaction असावी असाच सामाजिक प्रघात आहे.
ReplyDeleteShe will feel sad afterall she is part of that family
ReplyDeleteपरिस्थिती चा स्वीकार। दुसरा पर्याय नाही।
ReplyDeleteदुसर्याच्या आनंदात आपले आनंद पाहणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे
ReplyDeleteभारतीय समाजजीवनातील विवाहसंस्था ही एक महत्त्वपूर्ण सामाजिक संस्था आहे. या सामाजिक संस्थेला विवाहानंतर पूर्णत्व मिळते ते खऱ्या अर्थाने या नवदाम्पत्याला संतती झाल्यानंतर. या कुटुंबातील नवदाम्पत्याला संतती होत नाही तोपर्यंत स्वत: हे दाम्पत्य तर चिंताक्रांत असते परंतु यात भर पडते ती कुटुंबांतील इतर सदस्यांनकडून जेव्हा विचारपूस केली जाते. या चिंताक्रांत अवस्थेत हे नवदाम्पत्य जगत असतानाच नवऱ्यात दोष असला तरी मूल होत नाही म्हणून यावेळी बहुतांश वेळा त्या स्त्रीलाच दोषी ठरवले जाते व तिलाच समाजातील सर्व लोक टोमणे मारतात, खोचक बोलतात.ही समाजरीत आहे. त्यामुळे मूल होण्यासाठी ही स्त्रीच दोषी ठरवून तिला असह्य त्रास बऱ्याच वेळा केला जातो किंबहुना कधी कधी तर तिला जीवेही मारले जाते..हे आजचे समाजवास्तव आहे. या कथेच्या संदर्भाने मात्र थोडे वेगळे कथानक आकार घेताना दिसते. या कथेतील दाम्पत्याला सतरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मूल होण्याची आनंदाची बातमी असते. या आनंदाच्या बातमीला डॉक्टरांकडून ऐकताच या कथेतील आई होणाऱ्या स्त्रीचा आनंद गगनात मावेनासा होतो परंतु हा आनंद अल्पजीवी ठरतो. या कथेतील आई होणारी स्त्री आपले मूल होण्याचे पाॅझिटिव्ह रिपोर्ट घेऊन ही आनंद वार्ता आपल्या कुटुंबियांना सांगण्यासाठी घरी येते. त्याचवेळी घरी एक दु:खद घटना घडते ती म्हणजे या स्त्रीच्या पतीचे दुर्दैवाने रस्ता अपघातात मॄत्यू होतो. ही घटना खरे तर मोठा मानसिक आघात करणारी असते. या कथेतील असणारी सासू आपला मुलगा गेल्याचे दुःख करते. त्याचवेळी कथेतील असणारी सून ही आपल्या पतीच्या निधनाने पुरती हादरुन जाते. तिचा आई आपण आई होणार हा आनंद दवाखान्यापासून तर घरापर्यंतच राहतो. या कथेत प्रामुख्याने दोन विविध पात्रांच्या मानसिक संघर्षाचे चित्रण या कथेत येते.एक म्हणजे आपल्याला मूल होणार हा आनंद घेऊन आलेली आई ; आपल्या पतीच्या निधनाने अत्यंत दु:खी होते. तिची मानसिक अवस्था ही एकीकडे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आनंद व दुसरीकडे आयुष्यभराच्या जोडीदाराचे अचानकपणे निघून जाणे. एकीकडे आपल्याला मूल होणार हा आनंद तर दुसरीकडे पतीनिधनाचे अतीव दुःख अशीच काहीशी आनंदमिश्रीत दु:खाची अनुभूती या कथेतील सूनेची आहे. त्याचवेळी आपला मुलगा जाण्याचे दु:ख असणारी परंतु नातवाच्या आगमनाविषयी अद्यापतरी अनभिज्ञ असलेली आजी आपल्या मुलांच्या दु:खात आकंठ बुडालेली दिसते. या ठिकाणी एक मुलगा गमावलेली आई व एक मुलाला जन्म देणारी आई परंतु पती गमावलेली स्त्री या दोन विभिन्न प्रकारच्या मानसिक संघर्षाचे चित्रण लेखकाने अप्रतिमपणे केले आहे. या ठिकाणी दु:ख हे दोन्ही आईंच्या वाट्याला येते परंतु या दोन्ही दु:खाचे पदर मात्र वेगवेगळे आहेत.एकूणच, मानवी समाजात जाणाऱ्याला निरोप देणे आणि नवागताचे स्वागत करणे ही परंपरा असली तरी मात्र या कथेतील दोन्ही आईंचे दु:ख अंतिम आहे.या दु:खाला सीमा नाहीत.. या कथेच्या संदर्भाने लेखकाने अतिशय छोट्या प्रसंगाला भावनिक पातळीवर समजून घेत विविध भावानुभव फार सूक्ष्मपणे उलगडले आहेत हे मात्र नक्की.....
ReplyDelete