(Gender equality: The novel way..!)
(ललित लेख ४४,
© डॉ. अमित)
पर्मनंट वैद्यकीय अधिकारी म्हणून आदिवासी भागात झालेले पहिलेच पोस्टिंग... वेगळे लोक, वेगळी संस्कृती...
.
.
.
रात्रीच्या आठ वाजता क्वार्टरचा दरवाजा कोणीतरी वाजवला...
.
.
.
डोक्याला पट्टी बांधलेल्या आणि रक्ताळलेला शर्ट घातलेल्या आजोबांना बघताच मी गडबडीत पळतच पीएचसीत गेलो.
.
.
.
“घाबरू नका आजोबा, भूल देऊन टाके घालू... आणि दोन इंजेक्शन... झालं मग... दहा मिनिटाचं काम...”
.
.
.
“पर, त्यच्यासाटी नाय आलोय म्याहयान¹¹... पयल्यांदा केस कर... डोखरी¹ लई मांजली²...”
.
.
.
“दाक्टर, हिकडं नांग³... रोज रातीला⁴ कुटतंय⁵ मह्यंला... मह्यला⁶ बरडेव⁷, डोकीत⁸ मारतंय ह्यो वाडघोबास⁹... मांग¹⁰ म्याहयान¹¹ कुटलं...” मागून येऊन आजी म्हणाली.
.
.
.
“कायंबी सांगताव¹² का दाक्टरला, डोखरे..?”
.
.
.
“आजी, तुम्ही दारू पिलाय?” मी...
.
.
.
“व्हय, मांग आमी डोखरा-डोखरी रोज पिताव... कुटतो बी रोज एकमेकायले¹³...”
____________________________________________________________
(वरील लेखात वारली भाषेचा मी वापर केला आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर प्रामुख्याने राहणाऱ्या वारली आदिवासींची ही बोलीभाषा आहे.)
(वारली शब्दार्थ-
¹= म्हातारी (डोखरा= म्हातारा)
²= गर्व होते
³= बघ
⁴= रात्री
⁵= मारणे
⁶= मला
⁷= पाठीवर
⁸= डोक्यात
⁹= म्हातारा
¹⁰= मग
¹¹= मी
¹²= सांगतेस
¹³= एकमेकांना)
अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com
खूप छान Sir
ReplyDeleteखूप अवघड आहे भाषा
ReplyDeleteखूप अवघड आहे भाषा समजायला पण अनेक आदिवासी समाजातील हे वास्तव आहे दिवसभर ढोपर फुटेस्तोवर काबाडकष्ट करतात आणि रात्री दारू पिऊन एकमेकांची टाळकी फोडतात... आणि परत नवा दिवस उगवला की पुन्हा गुण्या गोविंदानी कष्टाचा दिवस सुरू
ReplyDeleteThank you all...
DeleteNice language but difficult
ReplyDeleteNice story
ReplyDeleteखूप छान सर......bhatane ची घटना घडली वाटतंय
ReplyDeleteI have also seen females from tribal community of Akole (dist ahmednagar)who are habitual alcohol consumers....frequent quarrels homicides poverty n illiteracy all are consequences only due to alcohol in this society..Many campaigns are tried against "daru" by local authorities but still struggling to succeed completely.
ReplyDeleteVastavdarshan..khup chan amit.