देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे!!! (An unmatched philomthropist!!!)
‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे...
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे!!!’
(ललित लेख १६; © डॉ. अमित)
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे!!!’
(ललित लेख १६; © डॉ. अमित)
मार्च २०१७ मधील माझा ‘सिद्धगड’ ट्रेक...
गड चढाईला खूप उंच, कठीण आणि दिवसही उन्हाळ्याचे..!
गडमध्यावर ‘सिद्धगड’ गाव आहे. गावात फार तर २५ घरे... लहान, धाब्याची, कट्ट्यावर बांधलेली...
गावापासून जवळचे स्टँड आणि किराणा दुकान दहा किलोमीटरवर, तर जवळचा दवाखाना अकरा किलोमीटरवर...
रस्ता दाखवायला ‘स्वतःहून’ आलेल्या आजोबांशी बोलताना मी डॉक्टर असल्याचे त्यांना समजले... ते ऐकताच समोरच्या घरातील एक आजी बाहेर येऊन गुडघेदुखीवरच्या गोळ्या मागू लागल्या... गुडघे सुजून टम्म..!
‘थोड्या विचारांती’ माझ्याकडील पेनकिलरचे पाकीट मी त्यांना दिले.
.
.
.
.
.
गड फिरून सहा-सात तासांनी आम्ही परततो तर काय... पेरूच्या पानांचा चहा घेऊन आजी आमची वाट पाहत दारात उभ्या... फायद्या-तोट्याचा, होणाऱ्या त्रासाचा किंवा ओळखी-अनोळखीपणाचा कोणताही ‘विचार न करता’ !!!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

सिद्धगड ट्रेक-तीन गोष्टीं निर्दशनात आल्या,
ReplyDeleteअती दुर्गम वस्तीची व्यथा,आपला छंद, आणी तेथील प्रेमळ समाज.
आपल्या आभ्यासु छंदाला नमस्नम आणी शुभेच्छा.
bhande10@gmai,com
पेरूच्या पानाचा चहा नक्कीच गुळ घालून केलेला असेल व्हा खूप छान असणार ।
ReplyDeleteReally some human are full of humanity.
ReplyDelete