“नवरात्र: देवी “ती” आणि “ही”!”
(ललित लेख ५; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र २))
(वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५)
www.dramittukarampatil.blogspot.com
www.dramit100wordstories.blogspot.com
(ललित लेख ५; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)
“बाप रे! आज भाजीत परत मीठ जास्त पडलं... आता माझं काही खरं नाही... कशानं ‘मार खायचा’ इतकंच माझ्या हातात... दिवसभर नोकरी-प्रवासाची दगदग... वरून हा नऊ दिवसांचा ‘उपवास’; आणि जवळपास रोजच नवऱ्याचा मार... याच्यानेच पोट भरतेय मी... घालूनपाडून बोलणं तर नित्याचंच... देवा, कधी सुटका करशील रे माझी यातून?”
छायाचित्र: साभार, गुगल |
“... रोज मार खाते तरी सुधारत नाही, अवलक्षणी कुठली! स्वतः करते उपवास आणि मला मुद्दाम उपाशी ठेवते; कसली नवरात्र हिची, नाटकं नुसती...”
“अरे बाबा, आलो, थांब... ‘देवी’चं दर्शन घेऊन येऊ... नाही नाही, चप्पल नाही घालत मी नवरात्रीत... कडक भक्ती करतो मी ‘देवी’ची...”
घरची ‘देवी’ तशीच उपाशी... मार खाऊन रक्तबंबाळ... आणि, हृदयाशी अनंत जखमा कवटाळून..!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र २))
(वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५)
www.dramittukarampatil.blogspot.com
www.dramit100wordstories.blogspot.com
कटु सत्य
ReplyDeleteभयाण वास्तव , शिकलेले अडाणी ग्रामीण असो किंव्हा शहरी सर्वच समाजामध्ये हा प्रकार अनुभवायला मिळतो।
ReplyDeleteहो, खरंय.
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!
हे कधी बदलणार ? हा खरा प्रश्न आहे
ReplyDelete