‘‘खरा’ चोर’ (The big fish and the small fish!) (ललित लेख १८;© डॉ. अमित) फोटो सौजन्य: व्हेक्टरस्टॉक “पकडा पकडा... पळा लवकर...” गर्दी ओरडत होती. “... सापडला वाटतं... गाड्यावर वडापाव खाऊन पैसे न देता तसाच पळत होता...” “... घेऊन जा साहेब याला... चांगली थर्ड डिग्री दाखवा...” . . . . . “... सायेब, मारू नगा ओ... खरंच भूक लागली व्हती... नोकरी-धंदा देत नाय कोणच... मग पैसे कुठनं येणार..? पर मी ‘चोर न्हाई’..! ” “... मोठा शहाणा आहेस रे तू... चोरी करून वर शहाणपणा शिकवतोस मला..? चांगला सोलून काढा रे याला...” . . . . . वातावरण शांत झाल्यावर साहेब टी. व्ही. लावतात... “... ठळक बातम्या... लाखभर गुंतवणूकदारांचे ७५० कोटी रुपये बुडवणारा कार्तिक शहा फरार घोषित... क्रिकेट सट्टाप्रकरणातील तीन खेळाडूंची निर्दोष मुक्तता...” . . . . . “... मारू नका रे त्याला... सोडून द्या... ‘फक्त’ वीसच रूपयांची आहे त्याची भूक... तीही पोटाला ‘डंख मारणारी’..! ” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५...