Skip to main content

Posts

‘खरा’ चोर’ (The big fish and the small fish!)

‘‘खरा’ चोर’ (The big fish and the small fish!) (ललित लेख १८;©  डॉ. अमित) फोटो सौजन्य: व्हेक्टरस्टॉक “पकडा पकडा... पळा लवकर...” गर्दी ओरडत होती. “... सापडला वाटतं... गाड्यावर वडापाव खाऊन पैसे न देता तसाच पळत होता...” “... घेऊन जा साहेब याला... चांगली थर्ड डिग्री दाखवा...” . . . . . “... सायेब, मारू नगा ओ... खरंच भूक लागली व्हती... नोकरी-धंदा देत नाय कोणच... मग पैसे कुठनं येणार..? पर मी ‘चोर न्हाई’..! ” “... मोठा शहाणा आहेस रे तू... चोरी करून वर शहाणपणा शिकवतोस मला..? चांगला सोलून काढा रे याला...” . . . . . वातावरण शांत झाल्यावर साहेब टी. व्ही. लावतात... “... ठळक बातम्या... लाखभर गुंतवणूकदारांचे ७५० कोटी रुपये बुडवणारा कार्तिक शहा फरार घोषित... क्रिकेट सट्टाप्रकरणातील तीन खेळाडूंची निर्दोष मुक्तता...” . . . . . “... मारू नका रे त्याला... सोडून द्या... ‘फक्त’ वीसच रूपयांची आहे त्याची भूक... तीही पोटाला ‘डंख मारणारी’..! ” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५...

“बाबा, तुम्ही ‘जिवंत’ आहात!?” (Living humans, dead relations!)

“बाबा, तुम्ही ‘जिवंत’ आहात!?” (जिवंत माणसं अन् मेलेली नाती) (Living humans, dead relations!) (ललित लेख १७; © डॉ. अमित) (#१००_शब्दांत_कथा) (#100_word_story) छायाचित्र: निलेश; गुगल गावी राहणारे आपले वडील निवर्तल्याचा फोन आला म्हणून बेंगलोरहून निघून घरी लगबगीने पोहोचलेला अनिल... .  .  .  .  .  ‘... बाबा गेलेत... पण, इथं तर ‘तसं’ काहीच वातावरण दिसत नाहीये..!?’ .  .  .  .  .  अचानक कोणीतरी त्याला हाक मारते. .   .   .   .   .   तो भांबावून, “... बाऽबाऽऽऽ, तुम्ही.!? ... तुम्ही ‘गेला’ असं समजलं; म्हणून... ” .   .   .   .     .   “... अंऽऽऽ... मीच सांगितलं होतं अद्वैतला ‘तसा’ फोन करायला... ... ...” .  .   .   .   .   “... बाबाऽऽऽ, काय थट्टा लावलीय आमची ?” .   .      .   .   .   “... थट्टा.!? काय...

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे!!! (An unmatched philomthropist!!!)

‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे!!!’ (ललित लेख १६; © डॉ. अमित) मार्च २०१७ मधील माझा ‘सिद्धगड’ ट्रेक... गड चढाईला खूप उंच, कठीण आणि दिवसही उन्हाळ्याचे..! गडमध्यावर ‘सिद्धगड’ गाव आहे. गावात फार तर २५ घरे... लहान, धाब्याची, कट्ट्यावर बांधलेली... गावापासून जवळचे स्टँड आणि किराणा दुकान दहा किलोमीटरवर, तर जवळचा दवाखाना अकरा किलोमीटरवर... रस्ता दाखवायला ‘स्वतःहून’ आलेल्या आजोबांशी बोलताना मी डॉक्टर असल्याचे त्यांना समजले... ते ऐकताच समोरच्या घरातील एक आजी बाहेर येऊन गुडघेदुखीवरच्या गोळ्या मागू लागल्या... गुडघे सुजून टम्म..! ‘थोड्या विचारांती’ माझ्याकडील पेनकिलरचे पाकीट मी त्यांना दिले. . . . . . गड फिरून सहा-सात तासांनी आम्ही परततो तर काय... पेरूच्या पानांचा चहा घेऊन आजी आमची वाट पाहत दारात उभ्या... फायद्या-तोट्याचा, होणाऱ्या त्रासाचा किंवा ओळखी-अनोळखीपणाचा कोणताही ‘विचार न करता’ !!! (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dram...

‘उंच’ शिखरावरचा ‘खुजा’ माणूस

‘‘उंच’ शिखरावरचा ‘खुजा’ माणूस’ (ललित लेख १५; © डॉ. अमित) स्थळ: महाराष्ट्रातील ‘सर्वोच्च’ शिखर ‘कळसुबाई’ वेळ: २६ मार्च, २०१७ ची टळटळती दुपार! मी तेथील एका बिस्किट विक्रेत्याच्या गोणपाटावर बसून त्याच्यासोबतच जेवतोय. ... तेवढ्यात एक उच्चशिक्षित ट्रेकर लागलेल्या भुकेमुळे आणि ‘वरती खायला इतर काहीच नसल्यामुळे’ बिस्किटे घ्यायला तिथे येतो. “किती पुडे देऊ साहेब?” “पाच...” “हे घ्या, तीस रुपये...” “तीस कसे, वीस ना? चार रुपये एमआरपी आहे एकाची... माहितीये ना?” “साहेब, २० किमीवरून कच्च्या रस्त्याने आणायला लागतं हे... नंतर ५५०० फूट उंच भर उन्हात खांद्यावरून हे ओझे चढवावे लागते... खाली चारलाच विकतो आम्ही... ” “ते मला नाही माहिती... वीस रुपये घेऊन गप्प बस, नाहीतर तक्रारच करतो तुझी.” ... तो तसाच उभा... पराभूत... निःशब्द... खुज्या विचारांच्या माणसांची ‘उंची’ मोजत..! (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५  www.dramittukarampatil.blogspot.com  www.trekdoctoramit.blogspot.com

‘फाटक्या कपड्यातला ‘भिकारी’ बाप’ (The father- torn deep inside!)

‘फाटक्या कपड्यातला ‘भिकारी’ बाप’ (The father- torn deep inside!) (ललित लेख १४; © डॉ. अमित) “काहीतरी दे, ‘बाळा’... दोन दिवस उपाशी आहे...” “पुढे जा ‘बाबा’,” गाडीची काच खाली करून तो बोलतो! “एका भिकाऱ्याचं बोलणं इतकं शालीन कसं काय?!” “ओऽऽ बाबा, थांबा... बोलायचंय तुमच्याशी.” ... ... ... ... ... ... ... “बोला...” “काही नाही. भिकारी असूनसुद्धा तुमची भाषा इतकी छान कशी? आहात कोण तुम्ही?” “... (हसून)... मी संपन्न-सुसंस्कृत घरचा आणि उच्चशिक्षित आहे... पण, मुलगा पत्निप्रीतीने आणि मी पुत्रप्रेमाने आंधळा झालो... सगळं मुलग्याच्या नावावर केलं... ... ... त्याने मला घराबाहेर काढलं...” “अरेरे, इतक्या चांगल्या बापाला ‘ ओळखले ’ नाही त्याने?!” “हं... आता ‘पाहिलं’ तरी खुरट्या दाढीच्या, तुटक्या चपला घातलेल्या, चिंध्यांआडच्या ‘फाटक्या बापाला’ ‘ओळखणार’ही नाही तो !” “ओह्... करतो काय तो आणि असतो कुठे?” “... हा काय... समोरच तर बसलाय माझ्या... मलाच ‘भिकारी ठरवून’ !!!” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) केवळ वॉट्सॲप...

‘... अजूनही तेच... “मेरा बाप चोर है!”’ (‘Still today... “Mera baap chor hain!”’)

‘... अजूनही तेच... “मेरा बाप चोर है!”’ (ललित लेख १३ ; © डॉ. अमित) (#१००_शब्दांत_कथा) (#100_word_story) माझ्या वॉर्डमधला अगदी काल-परवाचाच हा प्रसंग! एका ५-६ वर्षांच्या मुलग्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याला तपासायला घेऊन एक महिला आणि दोन पोलिस आले होते. पोलिसांमुळे गर्दीचे लक्ष तिकडेच! “काय झालं याला,” त्याच्या आईला मी विचारले. “बगा की डाक्टर... बेसुदासारका हाय ह्यो सकाळपसनं... बरळतुया सारका...” “असा कसा अचानक बेशुद्ध झाला तो,” मी. “सकाळच्याला माज्या दारुड्या न्हवऱ्याचा खून झालाय असं समजून माजी चवकशी करताना पोलिसांची काटी चुकून ह्येला लागली... रगात निगालं आन् बेसुदच झाला ह्यो... काय बी करा, पर वाचवा त्येला...” तेवढ्यात तो परत बरळला... “माज्या आईनं नाय मारलं आप्पाला... तिला मारताना त्योच पडला खाली आणि मेला... दारू पिऊन रोज मारायचा त्यो ‘माज्या’ आईला...” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५  www.dramittukarampatil.blogspot.com  www.trekdoctoramit.blogspot.com

घाम, अश्रू आणि रक्त! (Sweat, Tears and Blood)

‘घाम, अश्रू आणि रक्त!’ (ललित लेख १२; © डॉ. अमित) (#१००_शब्दांत_कथा) (#100_word_story) छायाचित्र साभार: गुगल “तुमच्या मुलीचं रक्त खूप कमी आहे; लवकरात लवकर चढवावं लागेल.” “खूप ठिकाणी चौकशी केली; पण ह्या रक्तगटाचं रक्त कुठंच नाही, डॉक्टर साहेब!” “हे बघा, प्रयत्न करा... पण रक्त तर लागेलच..!” “... ... ... ... ...” “क्या हुआ भाईसाब, क्यूँ इतना परेशान दिख रहे हो? और, आँखों में ‘आँसू’?” “... ... काही नाही... वो ख़ून चढ़ाना था लड़की को... और कल से मिल नहीं रहा है...” “मेरा चलेगा... एक ही ब्लड ग्रुप हैं हम दोनों का... सुबह ही सिस्टर बता रहीं थी...” “... विचारतो... पण..,” “पर क्या..? ‘हरा’ नहीं, ‘लाल’ ही हैं हमारा ‘ख़ून’...” “... बरोबरच आहे म्हणा... माणसं कसलीही असू देत... त्यांचे घाम, रक्त आणि अश्रू एकाच रंगाचे असतात की..!” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot.com www.trekdoctoramit.blogspot.com