“आठवांचा देवदूत... ‘चतुर’”
(ललित लेख ३; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)
(ललित लेख ३; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)
औरंगाबादमधील माझ्या होस्टेलच्या खिडकीतून दिसणाऱ्या पिंपळवृक्षाच्या शेंड्याभोवती गेल्या महिनाभरापासून ‘चतुरां’नी गर्दी केली आहे...
चतुरांची अशीच गर्दी मी महाराष्ट्राचे चेरापुंजी असणाऱ्या गगनबावड्याच्या सर्वोच्च टोकावर बसून २०१३ च्या पावसाळ्यांत अनुभवलीये. समोर अथांगपणे पसरून ‘निळ्याशार नभाला’ गवसणी घालणारी आणि ‘हरित तृणाच्या मखमालीचे हिरवे हिरवे गार गालिचे’ पांघरलेली सह्यशिखरे आणि चारी बाजूला ‘मुक्तछंदात’ उडणारे ‘चतुर’!
![]() |
| औरंगाबादमधील माझ्या होस्टेलच्या खिडकीतून दिसणारे पिंपळझाड आणि त्याभोवती मुक्तछंदात उडणारे ‘चतुर’! |
चतुरांची अशीच गर्दी मी महाराष्ट्राचे चेरापुंजी असणाऱ्या गगनबावड्याच्या सर्वोच्च टोकावर बसून २०१३ च्या पावसाळ्यांत अनुभवलीये. समोर अथांगपणे पसरून ‘निळ्याशार नभाला’ गवसणी घालणारी आणि ‘हरित तृणाच्या मखमालीचे हिरवे हिरवे गार गालिचे’ पांघरलेली सह्यशिखरे आणि चारी बाजूला ‘मुक्तछंदात’ उडणारे ‘चतुर’!
| पावसाळ्यात गगनबावड्याच्या सर्वोच्च शिखरावरून दिसणारा नजारा... (उजव्या कोपऱ्यात एक ‘चतुर’ बागडताना दिसतोय! |
The next time you happen to spy; the flight of a hovering dragonfly... ’मध्ये वर्णिल्याप्रमाणे आपल्या प्रियजनांचे संदेश घेऊन येणारे ‘ते’ आत्मेच जणू! पाण्याखाली जन्म घेऊनही गगनभरारी घेणारे, बदलत्या जीवनचक्राकडून आत्मभान शिकणारे, अलिप्तपणे सुख-दुःखांना स्पर्शणारे... आणि, जीवनाच्या क्षणभंगुरत्वाचे ‘स्व-ज्ञान’ गूढरम्य ठेऊन स्वच्छंदीपणाने उडत, आपल्या सोनेरी रंगाने मंत्रमुग्ध करणारे देवदूत...चतुर!!!

चतुर
ReplyDeletePanghoda....
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete