Skip to main content

‘ही ‘माणुसकी’ मरायला हवी!’ (This kind of humanity should die!)

‘ही ‘माणुसकी’ मरायला हवी!’
(ललित लेख ९; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)

“सोडा हो मला; नाहीतर गुन्हेगारच वाटत असलो तर, थेट गळा कापून ‘पूर्ण’ मारून तरी टाका एकदाचं...

‘जेसीबी’चं ‘रक्ताळू’ पातं पाठीत घुसून माझ्या मणक्याचा खुळखुळा करत, पोट ‘फोडत’ ज्यावेळी आरपार गेलं, त्यावेळी असह्य वेदनांची अशी काही शिसारी उठली, की बस्स..!



माझ्या आईच्या पाच पिढ्यांनी तुमच्या घराचं ‘गोकुळ’ केलं..! त्यांची जातिवंत खोंडं ताकद आणि शर्यतीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होती...शेतीच्या कामाचाही आम्ही कंटाळा केला नाही...

बैलपोळ्याला आमचा काय थाट असायचा..! जन्मजन्मांतरीचं नातं असल्यासारखं वाटत होतं; पण तुम्ही ‘माणूस’च असल्याचं पुन्हा सिद्ध केलं..!

मी थोडा आक्रमक झालो, हे मान्य... तरीही...

तुमच्यातल्या क्रूर गोष्टींना ‘पाशवी’ संबोधून आमचा अपमान करणाऱ्या तुमच्या निष्ठूर, दुष्ट आणि विकृत ‘माणुसकी’चे काय..?”

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५  
www.dramittukarampatil.blogspot.com  
www.trekdoctoramit.blogspot.com

Comments

  1. कधीकधी असं वाटतं .... एवढं सुंदर जग निर्माण करणाऱ्या देवाने माणूस नावाच्या प्राण्याला बुद्धी देवून चूक केली .... :(

    ReplyDelete
  2. खरच आहे ही..... ही माणुसकी मरायला हवी.

    ReplyDelete
  3. भारतात प्राण्यांसाठी सातत्याने माणुसकी असंवेदनशील होऊन जाते

    ReplyDelete

Post a Comment