Sunday, November 10, 2019

“माणुसकीतही ‘दुटप्पीपणा’ असतो तर!” (Hypocrisy in humanity!)

“माणुसकीतही ‘दुटप्पीपणा’ असतो तर!”

(ललित लेख ७; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)

किडनीच्या चौथ्या स्टेजच्या कर्करोगाचे निदान झाल्यामुळे भविष्य अंधकारमय झालेला साडेतीन वर्षांचा एक मुलगा.

डॉक्टर रुग्णाच्या वडिलांना समजावतायंत, “प्रयत्न करू; पण फार काही फायदा होईल असं वाटत नाही.”

वडील म्हणतात, “सगळे प्रयत्न करा डॉक्टर. गाडी विकली आहे, पाहिजे तर घरदार विकतो; पण बरं करा त्याला.”

रुग्णाचे वडील संध्याकाळी माझ्याबरोबर गेटपर्यंत बोलत येतात.

गेटजवळ कुत्र्याचं एक पिल्लू मागचे दोन्ही पाय लुळे झालेल्या अवस्थेत पडलंय. त्याची आई काळजीने चाटतेय त्याला!

बोलत-बोलत जास्त जवळ गेल्यामुळे ती कुत्री आमच्यावर गुरगुरते.

‘ते' “वडील” जोरदारपणे एक दगड कुत्रीच्या दिशेने भिरकावतात. ती विव्हळते!

डोळ्यांसमोर राहतं ते ‘लुळं पिल्लू’... आणि कोणत्यातरी ‘वडिलां’नी मारल्यामुळे झालेल्या असह्य वेदनांनी तळमळणारी ‘असहाय्य’ “आई”!!!



(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

5 comments:

  1. compassion so low only up to his child

    ReplyDelete
  2. अतिशय समर्पक लेख 🙏🙏

    ReplyDelete
  3. अतिशय समर्पक लेख 🙏🙏

    ReplyDelete
  4. दोघांच्या वेदना सारख्याच आहेत पण भूमिका वेगवेगळ्या एकाकडे एकाकडे ताकत आणि दुसऱ्याकडे अगतिकता कुत्र्याच्या पिल्लाची आई अगतिक आणि रुग्णाचा बाप ताकतवर, रुग्णाचा बाप अगतिक डॉक्टर ताकतवर भूमिका बदलली की अगतिकता पण बदलते । शेवटी माणुसकीपण ताकतीनुसार बदलते ।

    ReplyDelete

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावध...