‘रंगमंच की कठपुतलियाँ!’
(ललित लेख १०; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com
(ललित लेख १०; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)
“... बाळ गेलंय तुमचं... त्याच्या हृदयाचे ठोके पूर्ण बंद आहेत आणि मशीनवरसुद्धा श्वास चालत नाहीये त्याचा...”
“परत एकदा बघा ना डॉक्टर... बाहेरून काही औषधं आणायची असतील तर लिहून द्या; पण वाचवा त्याला...”
“खूप नवसायास करून झालंय हे बाळ... आम्ही दोघं पण आता पन्नाशीत आहे... सगळे प्रयत्न केले... शेवटी ‘टेस्ट-ट्यूब’नं झालं... आठ-दहा लाख गेले... कर्जाचा डोंगर झाला... तरीही हार नाही मानली आम्ही... आणि, आता ते पण राहत नाही म्हटल्यावर काय होईल आमचं... कुणाकडे बघायचं आम्ही?”
मी हतबल... तसाच ‘निर्विकार’ उभा... करण्यासारखं काहीच नव्हतं हातात...
“आपण फक्त उपचार करतो; ‘वाचवणारा - न वाचवणारा’ ‘तो’च..! माणसाने प्रयत्न करायचे; यश-अपयश ‘त्या’च्या हातात... सारे ‘त्या’च्या मर्जीचे गुलाम...” पाठीमागून सर म्हणाले!!!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

बालरोग विभागात काम करत असताना असे अनुभव रोज येतो पण दुर्दैवानं बऱ्याचदा हातात काहीच नसतं अगतिकतेने डॉक्टरांकडे बघणारे आई वडील आणि तेवढेच अगतिक आणि हतबल आपण ।
ReplyDelete