‘‘उंच’ शिखरावरचा ‘खुजा’ माणूस’
(ललित लेख १५; © डॉ. अमित)
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com
(ललित लेख १५; © डॉ. अमित)
स्थळ: महाराष्ट्रातील ‘सर्वोच्च’ शिखर ‘कळसुबाई’
वेळ: २६ मार्च, २०१७ ची टळटळती दुपार!
मी तेथील एका बिस्किट विक्रेत्याच्या गोणपाटावर बसून त्याच्यासोबतच जेवतोय.
... तेवढ्यात एक उच्चशिक्षित ट्रेकर लागलेल्या भुकेमुळे आणि ‘वरती खायला इतर काहीच नसल्यामुळे’ बिस्किटे घ्यायला तिथे येतो.
“किती पुडे देऊ साहेब?”
“पाच...”
“हे घ्या, तीस रुपये...”
“तीस कसे, वीस ना? चार रुपये एमआरपी आहे एकाची... माहितीये ना?”
“साहेब, २० किमीवरून कच्च्या रस्त्याने आणायला लागतं हे... नंतर ५५०० फूट उंच भर उन्हात खांद्यावरून हे ओझे चढवावे लागते... खाली चारलाच विकतो आम्ही...”
“ते मला नाही माहिती... वीस रुपये घेऊन गप्प बस, नाहीतर तक्रारच करतो तुझी.”
... तो तसाच उभा... पराभूत... निःशब्द... खुज्या विचारांच्या माणसांची ‘उंची’ मोजत..!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

10 रुपयासाठी गरीब माणसासोबत हुज्जत घालणारे हे तथाकथित बिनडोक उच्चशिक्षित जेंव्हा मॉल मध्ये जातात तेंव्हा MRP पाहत नाही 10रु MRP च्या वस्तूसाठी 50 रु मोजताना मूक गिळून बसतात तेथे यांची अक्कल हुशारी का शेण खाते ? फक्त गरीब, दुर्बल व्यक्ती, शेतकरी, कामगार दिसले यांना कायदा दिसतो।
ReplyDelete👍
ReplyDeleteMast
ReplyDeleteघडलेल्या घटनेचा मी ही साक्षीदार आहे 👍👍 सलाम आपल्या बौद्धिक आकलन शक्तीला सर 🙏
ReplyDeleteSarthak shirshak ahe....
ReplyDelete