Skip to main content

बांध- शेतातला; बंध- मनांचा!!! (The bridge-gap!)

‘बांध- शेतातला; बंध- मनांचा!!!’
(ललित लेख २०; © डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story




दोन सख्ख्या भावांनी एकमेकांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस तपासासाठी गावात आले आहेत... तलाठीही सोबत आहे.

“साहेब, ही दिनकरची आणि ती तिकडची सख्या पवारची जमीन,” तलाठी म्हणाला, “... आणि, हा बांध..!

“साहेब, दिन्याने शेत सपाट करताना बांध एक फूट माझ्या बाजूला ढकलला आणि कारण विचारल्यावर मलाच मारले. मग मी का गप्प बसू?”

“भाऊजींनी पण मागच्या वर्षी तसंच केलं होतं...” दिनकरची बायको म्हणाली.

“... बांधाच्या दोन्ही बाजूंची ५-५ एकर जमीन तर तशीच पडीक पडली आहे की रे ×××××... ‘वडिलोपार्जित’ म्हणून नोंद आहे,” साहेब म्हणाले, “ती पिकवा की आधी;  तुमचं कर्तृत्व काय..?
.
.
.
.
.
“... चूक झाली आमची, साहेब...” भाव‘बंधा’च्या जाणिवेने अश्रूंचा ‘बांध’ फुटलेले दोन्ही भाऊ  एकसुरात म्हणाले !

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
(केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५)
(www.dramittukarampatil.blogspot.com)
(www.trekdoctoramit.blogspot.com)




Comments

  1. प्रश्न जेंव्हा शेताच्या बांधाचा येतो तेंव्हा शेतकऱ्याच्या मनाला कोणताही बांध राहत नाही मग कितीही शेती अशीच ओसाड पडली असेल तरी देखील सर्व लक्ष त्या फूटभर बांधावरच केंद्रित असते। कधी कधी असे वाटते भाऊबंदकी हा शब्द भाऊ'बांध'की या वरून आला असेल का?

    ReplyDelete

Post a Comment