Skip to main content

ग्लास: अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?! (Glass: Half full or half empty?!)

‘ग्लास: अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?!’
(ललित लेख १९; © डॉ. अमित)
#१००_शब्दांत_कथा
#100_word_story



दोन सख्ख्या भावांची मुलाखत...
घरची परिस्थिती...

वडील खूप दारू प्यायचे; मारामाऱ्या करायचे.
काहीच काम करायचे नाहीत.
आईला, आम्हाला भरपूर मारायचे.
आम्हाला शाळेला पाठवायचे नाहीत.
पुस्तकं दिसताक्षणीच फाडून टाकायचे.

(१) पहिला भाऊ-
... म्हणून, मी शाळा सोडली.
घरात न थांबायचो नाही.
उनाडक्या करायचो.
मित्रही तसेच.
पैशासाठी चोऱ्या-माऱ्या केल्या.
जेलमध्ये गेलो.
समाजात माझी किंमत शून्य आहे.
... माझा अर्धा ग्लास रिकामा होता!

(२) दुसरा भाऊ-
... म्हणून, मी काहीही करून परिस्थिती सुधारायचीच असे ठरविले.
दिवसा दुकानात काम करून रात्रशाळेत गेलो.
मित्रांची पुस्तकं घेऊन माळ्यावर दिव्याखाली अभ्यास केला.
जिद्द पाहून शिक्षकांनीही पैशांची मदत केली.
बी. कॉम. करून सी. ए. झालो.
मी समाजाचा आदर्श झालो.
आईही माझ्याकडेच असते!
... माझा अर्धा ग्लास भरलेला होता!!!


(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

Comments

  1. एकच परस्थिती पण दृष्टीकोन वेगळे, खूप सुंदर.

    ReplyDelete

Post a Comment