Skip to main content

“बिनकामाची अविचारी माणसं...” (People of ‘no use...’)

‘बिनकामाची अविचारी माणसं..!’
(ललित लेख २२, © डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story



“ओऽऽ, बॉडी न्यायचीय ना बाळाची? कागदपत्रं आणा लवकर... कधीचं मरून पडलंय ते..! काही काळजी वगैरे..? बिनकामाचे कुठले...”, सिस्टर आधी ‘झालेल्या’ पण; आता ‘न राहिलेल्या बापावर’ खेकसल्या.

“तीच धावपळ करतोय मी, ताई... बाळाची आई पण झटके आल्यामुळे आय. सी. यू. मध्ये भरती आहे. तिला पण मलाच बघावं लागतं... म्हणून उशीर...”

“ते तुमचं तुम्ही बघा... आमचा काही संबंध नाही त्याच्याशी... आणि; ‘ताई’ नाहीये मी तुमची... मला सिस्टरच म्हणायचं, कळलं ना?”

“... कळलं... सॉरी...”
.
.
.
.
.
“हे काय, बाळाच्या अवयवदानाची कागदपत्रं..! एवढ्या वाईट प्रसंगात पण इतके मोठे विचार..? ... मला माफ करा ‘दादा’; मघाशी मी तुम्हाला...”

“असूदे ‘सिस्टर’... ‘बाळाची काळजी’ आहे म्हणूनच अवयवदान करून ‘जिवंत ठेवतोय’ त्याला..!”

“... बिनकामाचा माणूस!!!
.
.
.
.
.
ओशाळलेपणा...



Comments

  1. सर,एखाद्या ह्रदयस्पर्शी प्रसंगाला नेमकेपणाने शब्दात आशयपूर्णतेने पकडण्याचे कौशल्य अप्रतिम...एखादा व्यक्ती दु:खातही एवढा व्यापक विचार करु शकतो ही साकारलेली मानसिक भावावस्था माणसाला नि:शब्द करून टाकते....

    ReplyDelete

Post a Comment