“उघड्या संसाराचा गवंडी” (The poor bricklayer...)
(ललित लेख २१; © डॉ. अमित)
#१००_शब्दांत_कथा
#100_word_story
संजयच्या घराचे बांधकाम चालू होते. सातवीतला त्याचा मुलगा अद्वैत रोज विटा रचणाऱ्या गवंड्यांकडे कुतूहलाने बघायचा.
आज गवंडी काकांशी जाऊन बोलायचेच असे अद्वैतने मनोमन ठरवले होते.
“काय काका, कसे आहात? बरंय का?” अद्वैतने संभाषणाला सुरुवात केली.
“व्हय रे बाळा... बरंच म्हणायचं आता...” पंचेचाळिशीतला जालिंदर गवंडी उत्तरला.
“असं का बोलताय काका? तुम्हाला काय अडचण आहे? आमचं घर तुम्ही बांधताय, मग तुमचं स्वतःचं घर किती मोठं असेल ना?”
“तू अजून लहान हायंस बाळा; तुला नाय कळायचं आमचं दुखणं... आमी गरीब फकस्त शीरमंत लोकांची घरं बांधतो... आमची पोरंबाळं-बायका-संसार; सगळं उगड्यावरच...”
.
.
.
.
.
“... तुमा लोकांची घरं उभारतो आमी; पर आमचा संसार सातजल्मात न्हाय उभा करू शकत..!”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
(केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५)
(www.dramittukarampatil.blogspot.com)
(www.trekdoctoramit.blogspot.com)

कटू वास्तव .....
ReplyDeleteकेवळ सहानुभूती जरी ठेवली त्यांच्यासाठी तरी आपण त्यांच्यासोबत चांगलं वर्तन करू शकतो.
ReplyDelete