Skip to main content

घामाचं मोल घामालाच..! (Sweating India: Clean India)

“घामाचं मोल घामालाच...!”
(कपडेवाली ‘बाई’: भाग १)
(ललित लेख २४; © डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story




“घ्या, तुमच्या नव्या बाळासाठी कपडे घ्या. बाळाला गरम ठेवा. एकदम स्वस्तात घ्या... मावशी, आई, ताई, अक्का... लवकर या...”

“मावशी, थांबा जरा... दाखवा बगू, कसली कापडं हायंत?”

“लहान बाळांचे आहेत ओ; चांगले आहेत... घ्या...”

“किती रुपये जोडी, मावशी?”

“शंभर, ताई... दोन घ्या; १८० ला... दोन लागतीलच की बाळाला...”
.
.
.
.
.
“... अवो मावशी, हे टकुचं आलं की ज्यादाचं चुकून... आमी फकस्त दोन सदरा-चड्डी जोड्याचंच पैकं दिलतं तुमाला..! घ्या ह्ये परत...”

“... चुकून नाही; मुद्दामच दिलंय मी ते...  तुम्हीपण माझ्यासारखीच कष्टाची भाकर खाताय हे बघून बरं वाटलं...”

“शेवटी ‘घामालाच घामाचं मोल’ म्हणत्यात, नव्हं का..?”

शेजारीच कुणाच्यातरी एफ. एम. वर जाहिरात चालू होती, “इक कदम... स्वच्छ भारत की ओर..!”



(डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९१८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.in

Comments

  1. अगदी बरोबर घामालाच घामाच मोल कळतं आणि ज्यांना दुसऱ्याच्या घामाचा मोल ज्याला कळलं नाही असे माल्या .... मोदी .... इ. देश सोडून पळतात आणि जे इथे राहतात ते मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खातात ...

    ReplyDelete

Post a Comment