जिंकलं कोण- ही ‘ती’ की ती ‘ती’?
(स्त्रीशक्ती, लोकशाही आणि सत्ता)
(ललित लेख ३०;
© डॉ. अमित)
#१००_शब्दांत_कथा
#100_word_story
√ ‘निकाला’चा दिवस!
१७ सदस्यीय ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ९-८ असा लागलेला...
त्यातील एक सदस्या काठावर उभी... इकडची पण आणि तिकडची पण... अशी!
सामना रंगला असतानाच ‘ती’ (= सदस्या) गायब!
‘आठ’वाल्यांनी ‘ती’ला आदल्या रात्री उचललंय...
‘नऊ’वाल्यांकडे धागधूग... कारण; पहिली ‘ती’ जिकडे; तिकडेच दुसरी ‘ती’ही (= सत्ता) जाणार!
‘नऊ’वाल्यांच्या गळाला ‘ती’चा नवरा!
.
.
.
.
.
√ सरपंच निवडीचा दिवस-
‘आठ’वाले पोलिस बंदोबस्तात ‘ती’च्यासह ‘नऊ’जणांना घेऊन पोहोचतात!
तुफान दगडफेक... निवडणूक अधिकारी घायकुतीला... पोलिसांचा लाठीचार्ज...
.
.
.
.
.
‘ती’चा नवरा: गपगुमान ‘नऊ’वाल्यांच्याकडं जा... तू तिकडनंच निवडून आल्यास!
‘ती’: आलती, पर आता न्हाय... आता मी अन् सत्ता दोनीबी ‘आठ’वाल्यांच्याकडंच हाय...
नवरा: मग मी सोडली तुला...
‘ती’: तू कशाला, मीच देते सोडचिठ्ठी... ‘सरपंच’ व्हणाराय मी गावची...
.
.
.
.
.
... जिंकलं कोण..?
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
सत्ता
ReplyDeleteउत्कृष्ट लेख
ReplyDeleteजिंकलं फक्त राजकारण ... सत्तेचं ... पैस्याच ... आणि स्वार्थाचं।
ReplyDeleteकमी शब्दात ,शब्दात मांडणी., एक चलचित्रपट डोळ्यासमोर दिसुन येतो.
ReplyDeleteपुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.