दुटप्पीपणा (भाग १)
Hypocrisy (Part 1)
(ललित लेख ३८,
© डॉ. अमित)
✓ प्रसंग १-
महाराष्ट्रातील एका कुपोषणग्रस्त जिल्ह्यातील एक उच्चस्तरीय शासकीय बैठक...
“डॉक्टर, तुमचं काम कुपोषित बालकांवर उपचार करण्याचे आहे... अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून त्यांचा आकडा ‘ठरवू’ आम्ही; तुमची ढवळाढवळ नको आहे आकडेवारीत... समजलं?”
“पण सर, ‘तज्ज्ञ’ तर आम्ही आहोत ना... सेविकांचे आकडे कसे खरे मानायचे? त्यांच्या रिपोर्टपेक्षा आकडा कितीतरी मोठा आहे...”
“डॉक्टर, खाली बसा गप्प... आम्ही ठरवू काय ते...”
✓ प्रसंग २-
एका मोठ्या वृत्तवाहिनीचा ‘ग्राउंड रिपोर्ट’...
“ ××× तालुका सर्वाधिक कुपोषणग्रस्त... कुपोषित बालकांचा आकडा अधिकाऱ्यांनी दाबला... शासनाची दिशाभूल...”
✓ प्रसंग ३-
“कोण डॉक्टर आहे त्या भागात? ‘शो-कॉज’* काढा...”
“पण सर, ते मागच्या मीटिंगलाच सांगत होते, आकडा मोठा आहे म्हणून... तुम्हीच त्यांना गप्प बसवलं...”
“... तुमचा शहाणपणा नकोय आता... चौकशी होईपर्यंत निलंबित करा त्यांना...”
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
*शो-कॉज= कारणे दाखवा नोटिस
(डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.trekdoctoramit.blogspot.com

अपात्र लोकप्रतिनिधी जोपर्यंत शासकीय व्यवस्था पाहत आहेत तोपर्यंत आणि काय होणार सारजी.?
ReplyDeleteडॉ साहेब भुतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ ह्या तीनही काळात सत्व,रज तमोगुणी लोक असतांना या घटना घडनारच!पण आपण सत्वगुणी मानसांन आपलं समाधान होईल असे वागाव.परंतु त्याचा त्रास इतरांना होणार नाही याची काळजी घ्यावी.
ReplyDeleteविचार करायला लावणारा लेख
ReplyDeleteआतातरी जनता शहाणी झाली पाहिजे
सर,प्रस्तुत कथेच्या संदर्भाने प्रशासकीय यंत्रणेच्या एकूणच कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आपल्या वर्तमान स्थितीत प्रशासकीय यंत्रणेत खरे बोलणाराची मुस्कटदाबी केली जाते त्याचवेळेला दुसऱ्या बाजूला संधी साधून त्याचा पध्दतशीरपणे बळी देखील अनेकदा घेतला जातो हे वास्तव आहे.प्रशासनात केवळ नोकरी म्हणून सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा जबाबदारी म्हणून सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या कमी असली तरी ती महत्त्वाची आहे परंतु आज मात्र भ्रष्ट्राचाराच्या गर्तेत अडकलेल्या अधिकाऱ्यांकडून अशा नि:स्वार्थी अधिकाऱ्यांचा वरिष्ठांच्या संगनमताने बळी घेतला जातो. या कथेच्या निमित्ताने आपल्या भ्रष्ट शासकीय यंत्रणेचे वाभाडे तर निघतातच परंतु हे असेण जर राहिलं तर आपला देश महासत्ता कसा होणार?हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. या कथेत कुपोषणाच्या संदर्भाने शासकीय यंत्रणेची उदासीनता तर दिसतेच त्याचबरोबर 'मड्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या'प्रवॄत्तीचेही यानिमित्ताने चित्रण येते. एकूणच, ही कथा संवाद, पात्रचित्रण, प्रसंगनिर्मिती, निवेदन,भाषा,इ.माध्यमातून आपली एक वेगळी ओळख जपते हे मात्र नक्की!
ReplyDelete