दुटप्पीपणा (भाग ३)
Hypocrisy (Part 3)
(ललित लेख ४०,
© डॉ. अमित)
‘विशेष निधी’चे वाटप झाल्यानंतरची जिल्ह्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याची बैठक...
.
.
.
“हे बघा, अॅम्ब्युलन्सच्या डागडुजीसाठी प्रत्येकी दहा हजारांचा निधी आला आहे... इतके काही लागत नसतातच... पाच-पाच हजार ‘वळते’ करा... ‘समझनेवालों को..!’”
.
.
.
“पण, सर, आमची अँब्युलन्स खूपच खराब आहे. तीस हजार तरी लागतील म्हणतो इंजिनीअर... गावात दुसरी गाडी नाही..
“तुम्ही नवीन आहात खात्यात... ‘समजेल’ हळूहळू... खूप विचार करू नका गावाचा”
“सर, मागच्या महिन्यात एक गरोदर माता मृत्यूमुखी पडली... गाडी चालूच झाली नाही आमची शेवटपर्यंत... दवाखान्याजवळच तडफडून मेली बिचारी...”
“मूर्ख आहात का तुम्ही? तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही हे सगळं? बसा गप्प... पैसे पाठवा इकडे आणि जा समाजसेवा करायला... ‘वर’पर्यंत सगळ्यांना ‘सांभाळावं लागतं’ मला...”
अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

👌🙏 अगदी सहज सोपे वास्तव मांडले आहे साहेब
ReplyDeleteCorruption is everywhere, God knows when it stop. Nice blog
ReplyDeleteSir ironically it's true
ReplyDeleteदुर्दैव आहे हे देशाचं
ReplyDeleteदुर्द्यवी सत्य! Need to reach this article to official doing such corruption and shld be exposed! 🙏🏻
ReplyDeleteTrue..
ReplyDeleteOpen secret. ..
ReplyDelete