“टू बी ऑर नॉट टू बी...”
(संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2)
(© डॉ. अमित,
ललित लेख ३७)
✓ प्रसंग १-
“कशाला एवढं ‘टेन्शन’ घेताय, सर? लाख-दोनलाख घ्या आणि करून टाका सही... तुम्हाला नको असतील तर ‘वर-खाली’ वाटून टाका...”
“जोशी, फार बोलू नका... सेक्रेटरी आहात, सेक्रेटरीसारखे रहा... मला माहितीये ‘काय बरोबर, काय चूक’ ते...”
“... साहेऽब, माझेही केस उगाच नाही पांढरे झाले... तुम्ही कालपरवाचे... तुमच्या भल्याचंच सांगतोय... बघा ‘वरून’ फोन येतो की नाही ते...”
✓ प्रसंग २-
साहेबांना त्यांच्या साहेबांचा फोन येतो...
“संदीप, तुला माहितीये, दरवर्षी १००-१२५ लोक आयएएस होतात... तू काही एकटाच नाहीस... मर्यादेत रहा... रहेजाच्या फाईलवर सही करून टाक... आदेश समज हवंतर...”
“... पण, सर..,” फोन कट होतो...
✓ प्रसंग ३-
“काय करू मी..? माझे संस्कार, तत्त्वं, स्वच्छ चारित्र्याची तळमळ, गरिबांना न्याय... सगळं एकदम पाण्यात..!”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

Bitter truth sir
ReplyDeleteकाबाड कष्ट करून उराशी बाळगून असलेलं ध्येय एका अघटीत विचारप्रणलीत धुळीला मिळतं याचे हे उत्तम उदाहरण पर लेख.Very beautiful article. Worth to think
ReplyDeleteप्रामाणिक पणे काम करताना अश्या प्रकारे अडचणी येतात च.
ReplyDelete