“व्यवस्था: व्हेंटिलेटरची की व्हेंटिलेटरवरची?”
(System: For ventilator or on ventilator?)
(ललित लेख ४५,
© डॉ. अमित)
प्रसंग १-
“काहीही करा जोशी; पण व्हेंटिलेटर आले पाहिजेत... पेशंट किती वाढले आहेत बघा... ‘क्रिटिकल’ झालीये ‘सिच्युएशन’ एकदम... ‘कोटेशन’ मागवा... दोन-तीन कंपन्या आहेत बऱ्यापैकी काम करणाऱ्या,” अधिष्ठाता ‘सीएओं’ना* म्हणाले.
“सर, पण प्रशासकीय मंजुरी वगैरेला वेळ लागेल... कलेक्टर साहेबांनीही खर्चावर नियंत्रण ठेवायला सांगितले आहे मागील बैठकीत,” जोशी उत्तरले.
“मी बोलतो साहेबांशी... पेशंटचे जीव महत्त्वाचे आहेत की ‘प्रोसेस’ की खर्च,” डीन म्हणाले...
प्रसंग २-
“आज आपल्या शासकीय रुग्णालयात जे १० व्हेटिंलेटर आले आहेत त्यामुळे येथील जनतेला खूप फायदा होणार आहे. याकरिता आम्ही खूप प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांनीही जोर लावला,” उद्घाटनप्रसंगी लोकप्रतिनिधी म्हणाले.
प्रसंग ३-
वर्तमानपत्रातील बातमी-
“व्हेंटिलेरच्या अनुपलब्धतेमुळे शासकीय रुग्णालयाच्या ‘अधिष्ठात्यां’चीच प्रकृती ढासळली... जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा... अधिष्ठात्यांंनाा स्वतःचेेच दुर्लक्ष भोवले...”
-------------------------------------------------------------------------------------
महत्त्वाचे शब्द-
सीएओ*= मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer)
अधिष्ठाता= डीन
-------------------------------------------------------------------------------------
(डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या प्रवृत्तीची आज गरज आहे
ReplyDeleteअप्रतिम संदेश समजने वाले को इशारा काफी है
ReplyDeleteVery good massage
ReplyDelete