संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..!
पहाटे ‘जॉगिंग’साठी करूळ घाटात गेलो होतो. घाटाच्या मध्यावर एक ऊसाचा ट्रक उलटलेला दिसला.
“कुणाला लागलं आहे का?” तिथे बसलेल्या शेतकऱ्याला मी विचारले.
“न्हाई, सायेब... मेलो असतो तर चाललं असतं... ऊस पण गेला आन् गाडी पण गेली,” तो.
“काही मदत हवी असेल तर सांगा,” मी.
फिरून परत येईपर्यंत शेतकऱ्याच्या घरची माणसं तिथे पोहोचली होती.
‘वरसाची कमाई पाण्यात गेली’ म्हणून ती मोठमोठ्यानं रडत होती.
.
.
.
त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारमधून एक स्त्री खाली उतरून शेतकऱ्याला म्हणाली, “थोडा ऊस द्या की... संक्रातीला पूजा करायला पाहिजेत.”
“परसंग काय आन् तुमचं काय, ताई?! घ्या ऊस... पर हे ऐकण्यापेक्षा मी मेलो असतो तर..,” आशाळभूत शेतकरी हतबलपणे म्हणाला.
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम.बी.बी.एस.,एम.डी. (बालरोग))
(© सदर लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन आहेत.)
(सदर लेखकाचा दुसरा वाचनीय ब्लॉग-

कोणत्या प्रसंगी कसे वागावे हे लोकांना आता समजेना झाले आहे.
ReplyDeleteलोकांना शेतकऱ्यांच्या दुःखाची व कष्टाची काडीची ही किंमत राहिली नाही आणि दुसरीकडे एवढं त्याच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही हा शेतकरी मदतीचा हात द्यायलाही मागेपुढे बघत नाही खरोखरच हा विरोधाभास कधी संपणार या समाजामधील.
Deleteखरंय... आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
Deleteछोट्याशा लेखातून खरंच लेखकाचे सूक्ष्म निरीक्षण आणि मोजक्या शब्दात समाज प्रबोधन वाखाण्याजोगे आहेवाखाण्याजोगे आहे
ReplyDeleteआपल्या निरीक्षणाला जागण्याचा माझा कायम प्रयत्न राहील.
Deleteआपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आभार!
ज्याची त्याची संक्रान्त वेगळी. कोणाची गोड़ तर कोणाची कडू, कोणाची लक्ख प्रकाशमय तर कोणाची मिट्ट काळोखी.
ReplyDeleteखूपच मार्मिक आणी विचार करण्यास भाग पाडणारा प्रसंग आपण अधोरेखित केला आहे. धन्यवाद
बरोबर बोललात.
Deleteआपल्या छान प्रतिक्रियेबद्दल आपले आभार!
अमित
ReplyDeleteछोट्या लेखातून खुप छान मार्मिक वास्तव मांडल आहेस
अभिनंदन
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
Deleteजनता भावना शून्य झालीय
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
Deleteसत्य परिस्थिती आहे ,कुणालाही शेतकऱ्यांची परिस्थिती माहीत नाही ,अगदी सरकार देखील असेच वागत आहे.
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
Deleteवास्तव दाखवणारा लेख शेतकऱ्याविषयी कोणालाही काही वाटत नाही अप्रतिम लेख दादा 👌
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया माझ्यासाठी बहुमोल आहे.
Deleteसाहेब. तुम्ही मोजक्या शब्दांत शेतकर्यांची व्यथा मांडलीत.... तसेच समाजातील कष्टकरी व गर्भश्रीमंत लोकांच्यातील दरी पण आपण एका वाक्यात दाखवलीत... प्रसंग कोणता.. आपण काय मागतोय याचे तारतम्य काही लोकांना नसते... हे पण आपण दाखवलेत.... अशाच कथा येथून पुढेही येत राहोत... धन्यवाद 🙏🙏
ReplyDeleteआपल्या प्रेमळ सूचनेबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
Deleteअसंवेदनशील समाजाचे छोटेसे प्रातिनिधिक उदाहरण दर्शवणारा लेख.
ReplyDeleteतसाच प्रयत्न मी केला आहे.
Deleteनमस्ते सर , खुप छान वास्तवशी निगडित, आणि तितकेच मार्मिक लिखाण केले आपण, परंतु फास्ट फूड खाऊन लोकं भावना शुन्य झाली आहेत.शिवाय निसर्गाशी निगडीत रहाणीमान संपल आहे . भावनांची कदरच राहिलेली नाही.शेळी गेली जिवानिशी खाणारा म्हणतो वातड , अशातला प्रकार आहे.
ReplyDeleteआपण म्हणता ते दुर्दैवाने खरे आहे.
Deleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल आपले आभार!