“वंशाचा दिवा” (ललित लेख ३१; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story ✓ ४० वर्षांपूर्वी- “पेढे घ्या अक्का; मुलगा झाला... ‘वंशाला दिवा’ मिळाला! “बरंय बाई; मला चारी पोरीच झाल्या... दिवा न्हाय; पणत्या म्हणं..!” “पणत्या का दिवट्या..?” ✓ ५ वर्षांपूर्वी- “आई... आम्ही सगळे ‘वेगळे’ राहतोय आता... सगळ्यांचीच घरं लहान आहेत... त्यात तू म्हणजे... तसं नव्हे; पण...” . “ आईची अडचण झाली का बाबांनू..?” . . . ... नीरवता... √ कालपरवाच- चारही मुलं आईला मारतायंत... . “गावात मागून खातेस, आई?” . “ आई म्हणायलाही लाज वाटते तुला...” . “मागच्याच महिन्यात ५०० रुपये पाठवले होते ना मी? काय केलंस त्याचं? इतकं लागतं का खायला तुला?” . “आरं लेकरा, पाश्श्यात काय हुतंय? आठ दिस बी पुरत न्हाईत ते...” ✓ आज- “तुम्ही उरकून टाका तिचं सगळं , सरपंच... पैसे पाठवतो आम्ही... यायला जमायचं नाही...” . . . . . (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६...