“आपलेच ओठ खाणारे आपलेच दात..!”
( When our own people rip us apart...)
(ललित लेख २९; © डॉ. अमित)
#१००_शब्दांत_कथा
#100_word_story
डिसेंबर २०१७ मधील ‘उगाचच अस्वस्थ’ वाटणारी एक दुपार!
‘इंज्युरी सर्टिफिकेट’साठी आलेली एक मध्यमवयीन स्त्री, तिची आई आणि भाऊ..!
“तुमच्या भैणीसारकी हाय ती लेकरा... नीट तपासा... पुलिसास्नी द्याचंय सर्टिफिकाट...” आजी म्हणाल्या.
“आजी, ताईंचं गळ्याभोवतीचं हाड तुटलंय... फोटोत* दिसतंय... सहजासहजी तुटत नाही ते... मारहाण वगैरे?”
“ तसं काही नाही... म्हणजे...” भाऊ म्हणाला.
“... ‘तसं काही’ म्हणजे..?”
“ डॉक्टरांच्यापासून काय लपवायचं म्हणा..! खरंय तुमचं... तिच्या दिरानेच तिच्यावर बलात्कार...”
“ ... तुम्ही ‘इंज्युरी सर्टिफिकेट’ का मागताय मग..? सरळ ३७६ नोंदवा की बलात्कारासाठी...”
“ नाही सर... हिच्या मुलीचं ठरलेलं लग्न मोडेल मग... घराला वाळीत टाकेल भावकी...”
“ का? यांची काय चूक त्यात!!!”
“ तसंचंय, सर... आपलेच दात; आपलेच ओठ..!”
.
.
.
.
.
. सुन्नपणा
. हतबलता आणि,
. निःशब्दपणा!!!
. हतबलता आणि,
. निःशब्दपणा!!!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
साहेब भारतीय समाजाचं हे विदारक दृश्य आहे .हे तुमच्या समोर आले म्हणून तुम्हाला समजले असे अनेक प्रकार रोज हजारो होतात .पण माणूस अनुभवातून शिकतो हेच खरे आजच्या कथेचे मर्म आहे .
ReplyDeleteसर,मानवी समाज जीवनात पशूसारखी हिंस्त्र माणसं आपल्या आजूबाजूलाच वावरत असतात. कधी कधी ही माणसं आपल्या नात्यातीलच असली तरी तीच माणसं नातेसंबंधाचा कुठलाही विचार न करता आपल्या नात्यातील स्त्री मग ती कुणीही (यात आई,बहीण,वहिणी,मावस बहीण,इ.) असो तिच्यावरच वासनांध नजरेने तर बलात्कार करतातच; तर कधी प्रत्यक्षच करतात.यावेळी त्या वासनांध व्यक्तीला त्याचे काहीही वाटत नाही. यावेळी मात्र त्या स्त्रीला, तिच्या मानसिकतेला समजून न घेता ही प्रकरणे घराची अब्रू जाईल म्हणून घरातच मिटवली जातात. त्याचेच दुष्परिणाम म्हणजे या व्यक्तींची ही प्रवॄत्ती वाढत जाते. त्यातूनच 'कुंपणच जेव्हा शेत खाते' अशी परिस्थिती निर्माण होते व साहजिकच लेखकाच्या मनात विचार येतो,'आपलेच ओठ खाणारे,आपलेच दात'. सर, या कथेच्या संदर्भाने एका बलात्कारपीडित स्त्रीच्या मानसिकतेचा कुठलाही विचार न करता समाज काय म्हणेल? या भीतीपोटीच अशी प्रकरणे घरातच दाबली जातात, मिटवली जातात कधी एखाद्या प्रसंगात ती स्त्री ऐकत नसेल तर सर्वांच्या मदतीने तिलाच संपविले जाते हे सामाजिक वास्तव नाकारता येत नाही. या कथेच्या निमित्ताने लेखक म्हणून एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाकडे पाहण्याची तुमची संवेदनशीलवॄत्ती प्रत्ययास येते.त्याचबरोबर त्या प्रसंगाला अगदी सहज ओघवत्या भाषेत व्यक्त करण्याचे तुमचं कसब निश्चितच नेहमीप्रमाणे उल्लेखनीय आहे....
ReplyDeleteडॉ.मिलिंद माणिकराव वाव्हळे, मराठी विभाग, मिलिंद कला महाविद्यालय, नागसेनवन, औरंगाबाद. मो.9421678635
ReplyDelete