Skip to main content

आपलेच ओठ खाणारे आपलेच दात..! (When our own people rip us apart...)

“आपलेच ओठ खाणारे आपलेच दात..!”
( When our own people rip us apart...)

(ललित लेख २९; © डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story




डिसेंबर २०१७ मधील ‘उगाचच अस्वस्थ’ वाटणारी एक दुपार!

‘इंज्युरी सर्टिफिकेट’साठी आलेली एक मध्यमवयीन स्त्री, तिची आई आणि भाऊ..!

तुमच्या भैणीसारकी हाय ती लेकरा... नीट तपासा... पुलिसास्नी द्याचंय सर्टिफिकाट...” आजी म्हणाल्या.

“आजी, ताईंचं गळ्याभोवतीचं हाड तुटलंय... फोटोत* दिसतंय... सहजासहजी तुटत नाही ते... मारहाण वगैरे?”

“ तसं काही नाही... म्हणजे...” भाऊ म्हणाला.

“... ‘तसं काही’ म्हणजे..?”

“ डॉक्टरांच्यापासून काय लपवायचं म्हणा..! खरंय तुमचं... तिच्या दिरानेच तिच्यावर बलात्कार...

“ ... तुम्ही ‘इंज्युरी सर्टिफिकेट’ का मागताय मग..? सरळ ३७६ नोंदवा की बलात्कारासाठी...”

“ नाही सर... हिच्या मुलीचं ठरलेलं लग्न मोडेल मग... घराला वाळीत टाकेल भावकी...”

“ का? यांची काय चूक त्यात!!!”

“ तसंचंय, सर... आपलेच दात; आपलेच ओठ..!
.
.
.
.
.
.  सुन्नपणा
.  हतबलता आणि,
.  निःशब्दपणा!!!





(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

Comments

  1. साहेब भारतीय समाजाचं हे विदारक दृश्य आहे .हे तुमच्या समोर आले म्हणून तुम्हाला समजले असे अनेक प्रकार रोज हजारो होतात .पण माणूस अनुभवातून शिकतो हेच खरे आजच्या कथेचे मर्म आहे .

    ReplyDelete
  2. सर,मानवी समाज जीवनात पशूसारखी हिंस्त्र माणसं आपल्या आजूबाजूलाच वावरत असतात. कधी कधी ही माणसं आपल्या नात्यातीलच असली तरी तीच माणसं नातेसंबंधाचा कुठलाही विचार न करता आपल्या नात्यातील स्त्री मग ती कुणीही (यात आई,बहीण,वहिणी,मावस बहीण,इ.) असो तिच्यावरच वासनांध नजरेने तर बलात्कार करतातच; तर कधी प्रत्यक्षच करतात.यावेळी त्या वासनांध व्यक्तीला त्याचे काहीही वाटत नाही. यावेळी मात्र त्या स्त्रीला, तिच्या मानसिकतेला समजून न घेता ही प्रकरणे घराची अब्रू जाईल म्हणून घरातच मिटवली जातात. त्याचेच दुष्परिणाम म्हणजे या व्यक्तींची ही प्रवॄत्ती वाढत जाते. त्यातूनच 'कुंपणच जेव्हा शेत खाते' अशी परिस्थिती निर्माण होते व साहजिकच लेखकाच्या मनात विचार येतो,'आपलेच ओठ खाणारे,आपलेच दात'. सर, या कथेच्या संदर्भाने एका बलात्कारपीडित स्त्रीच्या मानसिकतेचा कुठलाही विचार न करता समाज काय म्हणेल? या भीतीपोटीच अशी प्रकरणे घरातच दाबली जातात, मिटवली जातात कधी एखाद्या प्रसंगात ती स्त्री ऐकत नसेल तर सर्वांच्या मदतीने तिलाच संपविले जाते हे सामाजिक वास्तव नाकारता येत नाही. या कथेच्या निमित्ताने लेखक म्हणून एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाकडे पाहण्याची तुमची संवेदनशीलवॄत्ती प्रत्ययास येते.त्याचबरोबर त्या प्रसंगाला अगदी सहज ओघवत्या भाषेत व्यक्त करण्याचे तुमचं कसब निश्चितच नेहमीप्रमाणे उल्लेखनीय आहे....

    ReplyDelete
  3. डॉ.मिलिंद माणिकराव वाव्हळे, मराठी विभाग, मिलिंद कला महाविद्यालय, नागसेनवन, औरंगाबाद. मो.9421678635

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..!

संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..! पहाटे ‘जॉगिंग’साठी करूळ घाटात गेलो होतो. घाटाच्या मध्यावर एक ऊसाचा ट्रक उलटलेला दिसला. “कुणाला लागलं आहे का?” तिथे बसलेल्या शेतकऱ्याला मी विचारले. “न्हाई, सायेब... मेलो असतो तर चाललं असतं... ऊस पण गेला आन् गाडी पण गेली,” तो. “काही मदत हवी असेल तर सांगा,” मी. फिरून परत येईपर्यंत शेतकऱ्याच्या घरची माणसं तिथे पोहोचली होती. ‘वरसाची कमाई पाण्यात गेली’ म्हणून ती मोठमोठ्यानं रडत होती. . . . त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारमधून एक स्त्री खाली उतरून शेतकऱ्याला म्हणाली, “थोडा ऊस द्या की... संक्रातीला पूजा करायला पाहिजेत.” “परसंग काय आन् तुमचं काय, ताई?! घ्या ऊस... पर हे ऐकण्यापेक्षा मी मेलो असतो तर..,” आशाळभूत शेतकरी हतबलपणे म्हणाला. (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम.बी.बी.एस.,एम.डी. (बालरोग)) (© सदर लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन आहेत.) (सदर लेखकाचा दुसरा वाचनीय ब्लॉग- www. dramittukarampatil.blogspot.com )

मरणाचा चॉईस... (The choice of death...)

“मरणाचा चॉईस” (ललित लेख ३३, © डॉ. अमित) * तळटीप स्टेशनात विश्रांती घेणारे मालगाडीचे इंजिन शेजारच्या इंजिनाला म्हणाले, “माझी चाकं धुऊन मी केलेलं पाप जाणाराय का? धुवायचं सोड; ते लपवता तरी येणारंय का?” . . . “... आपण माणसं थोडीच आहोत; गंगेच्या पाण्यात डुबकी मारून ‘केलेली’ पापं ‘धुवायला’..?” . . . दुसरे इंजिन बिथरून म्हणाले, “झालंय काय तुला आज? चक्क ‘माणसा’सारख्या पापपुण्याच्या गोष्टी करतोयंस..!” . . . “... काय करू मग, सांग ना... काल ‘त्या’ गोरगरिबांना मी चाकाखाली चिरडले... रक्तामासांने भिजलो... ‘घामा’ने दरवळलो... चाकं धुतली; पण, झालेल्या पापाचं..?” . . . “... कसलं पाप? उलट जीवन‘चक्रा’तून ‘सोडवलंस’ तू त्यांना... आजाराने नाहीतर भुकेने; मरणारच होते ते... आणि, मरायचा तरी ‘चॉईस’ कुठंय गरिबांना..! जिवंतपणी कुणी विचारपूस केली त्यांची, जी आत्ता होणाराय?” . . . “... माणसं नाही रे; माणुसकीच मेलीय चाकांखाली..!” (* तळटीप- सदर चित्र हे मी फेसबुकवरून डाउनलोड केले असून ते बनविणाऱ्याचे नाव मला सापडले नाही. चित्राचे संपूर्ण क्रेडिट हे संबंधित चित्रकाराचेच आहे.) (...

“टू बी ऑर नॉट टू बी...” (To be or not to be...) (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2)

“टू बी ऑर नॉट टू बी...” (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2) (© डॉ. अमित, ललित लेख ३७) ✓ प्रसंग १- “कशाला एवढं ‘टेन्शन’ घेताय, सर? लाख-दोनलाख घ्या आणि करून टाका सही... तुम्हाला नको असतील तर ‘वर-खाली’ वाटून टाका...” “जोशी, फार बोलू नका... सेक्रेटरी आहात, सेक्रेटरीसारखे रहा... मला माहितीये ‘काय बरोबर, काय चूक’ ते...” “... साहेऽब, माझेही केस उगाच नाही पांढरे झाले... तुम्ही कालपरवाचे... तुमच्या भल्याचंच सांगतोय... बघा ‘वरून’ फोन येतो की नाही ते...” ✓ प्रसंग २- साहेबांना त्यांच्या साहेबांचा फोन येतो... “संदीप, तुला माहितीये, दरवर्षी १००-१२५ लोक आयएएस होतात... तू काही एकटाच नाहीस... मर्यादेत रहा... रहेजाच्या फाईलवर सही करून टाक... आदेश समज हवंतर...” “... पण, सर..,” फोन कट होतो... ✓ प्रसंग ३- “काय करू मी..? माझे संस्कार, तत्त्वं, स्वच्छ चारित्र्याची तळमळ, गरिबांना न्याय... सगळं एकदम पाण्यात..! ” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot.com www.trekdoctoramit.blogspot.com