“वंशाचा दिवा”
(ललित लेख ३१;
© डॉ. अमित)
#१००_शब्दांत_कथा
#100_word_story
✓ ४० वर्षांपूर्वी-
“पेढे घ्या अक्का; मुलगा झाला... ‘वंशाला दिवा’ मिळाला!
“बरंय बाई; मला चारी पोरीच झाल्या... दिवा न्हाय; पणत्या म्हणं..!”
“पणत्या का दिवट्या..?”
✓ ५ वर्षांपूर्वी-
“आई... आम्ही सगळे ‘वेगळे’ राहतोय आता... सगळ्यांचीच घरं लहान आहेत... त्यात तू म्हणजे... तसं नव्हे; पण...”
.
“आईची अडचण झाली का बाबांनू..?”
.
.
.
... नीरवता...
√ कालपरवाच-
चारही मुलं आईला मारतायंत...
.
“गावात मागून खातेस, आई?”
.
“आई म्हणायलाही लाज वाटते तुला...”
.
“मागच्याच महिन्यात ५०० रुपये पाठवले होते ना मी? काय केलंस त्याचं? इतकं लागतं का खायला तुला?”
.
“आरं लेकरा, पाश्श्यात काय हुतंय? आठ दिस बी पुरत न्हाईत ते...”
✓ आज-
“तुम्ही उरकून टाका तिचं सगळं, सरपंच... पैसे पाठवतो आम्ही... यायला जमायचं नाही...”
.
.
.
.
.
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
मुलगा पेक्षा मुलगी बरी दोन्ही घरी प्रकाश देई.... आज समाजाचे हे बोळकं रूप दर्शवणारा उत्तम लेख
ReplyDeleteकटू आहे पण वास्तव आहे,
ReplyDeleteTruth of current society
ReplyDeleteअतिशय सुदंर लेख आहे.
ReplyDeleteसर, जागतिकीकरणामुळे बदललेले मानवी समाजजीवन, कौटुंबिक नात्यातील आपलेपणा, भावनिक बंध हे दिवसेंदिवस बदलत चालले आहेत. त्यामुळेच आपल्या कौटुंबिक नात्यांमध्ये आपलेपणा ऐवजी कॄत्रिमता आपल्याला आज पहायला मिळते.काळ जसा जसा बदलत जातो तस तसे मानवी जीवन ही बदलत जाते. पूर्वी कौटुंबिक वातावरणात आपल्यावर सर्वच संस्कार व्हायचे त्यामुळेच वडीलधाऱ्या माणसांसोबत कसे वागावे? आई-वडील, भाऊ-बहिण, काका-काकू,इ.सर्वच व्यक्तींविषयी आदरभाव होता.हा एक संस्काराचाच भाग होता..या बरोबरच तत्कालीन समाजातही मुलाच्या जन्माचा आनंद साजरा होत असे. त्यात कौटुंबिक आनंद असे. याचवेळी मुलीच्या जन्माकडे तितक्याच पध्दतशीरपणे दुर्लक्ष केले जात असे.तसे आजही मुलीच्या जन्माकडे दुर्लक्षच केले जाते. काही वर्षांपूर्वी ज्या मुलाच्या जन्माचा आनंद कुटुंबिय साजरा करत असत.तो मुलगा कालांतराने आपल्या आईवडिलांची समाज काय म्हणेल म्हणून किमान काळजी घेत असे परंतु जागतिकीकरणामुळे मात्र ही स्थिती बदलली व वंशाचा दिवा असणाऱ्या मुलाला मात्र आपल्या आईवडिलांकडे बघायला वेळच नाही हे आजचे वास्तव आहे..आणि याच मानवाच्या बदलत जाणाऱ्या जीवनाचे चित्रण या कथेत केले आहे असे मला वाटते...
ReplyDelete