संदिग्धता (The Dilemma) (© डॉ. अमित, ललित लेख ३६) ✓ प्रसंग १- “डॉक्टर, कसे आहेत रिपोर्ट्स? अहो, गेली सतरा वर्षे बाळाची वाट बघतोय आम्ही... बाळ होत नसल्यामुळे काय काय सहन नाही केलं मी... बाहेरच्यांचे टोमणे, घरी सासू-नणंदेचा ‘जाच’... जाऊदे... सांगा ना लवकर, सर...” आरती म्हणाली. “हो, समजू शकतो... जग असंच असतं” डॉक्टर म्हणाले, “पण निराश होऊ नका... आज ‘गूडन्यूज’ आहे तुमच्यासाठी... Time to Celebrate..!” ✓ प्रसंग २- घरी आल्यावर पाहते तर काय, घरी मोठा आक्रोश सुरू आहे... सगळे रडताहेत... “अहो आई, काय झालं? नणंदबाई, तुम्ही तरी बोला की...” . . . “अगं काय बोलू? माझा एकुलता एक लाडका लेक सोडून गेला गं आपल्याला... शाळेतून येताना ट्रकने उडवलं त्याला... आता कुणाकडे बघू मी..?” ✓ प्रसंग ३- . . . कसं ‘रिअॅक्ट व्हावं आरतीने..? काय वाटतं तुम्हाला?” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot .com www.trekdoctoramit.blogspot.com