“भडका: स्टोव्हचा... की, नात्यांचा..?”
(The blown up relations...)
(ललित लेख ४२,
© डॉ. अमित)
एम. बी. बी. एस.ला असताना ‘शल्यचिकित्सा’ विभागातील ‘जळीतकक्षा’तील* पहिलाच दिवस!
.
.
.
९०% भाजलेल्या एका महिलारुग्णाचा पोलिस जबाब घेतायंत...
.
.
.
“ताई, नीट सविस्तर सांग काय ते... सासरचे जाच करत होते का..?” महिला पी. एस. आय. म्हणाल्या.
.
.
.
“नाही, नाही... खूप चांगली माणसं आहेत हो ती... सासू-सासरे तर माई-आण्णांसारखे प्रेम करतात माझ्यावर... नवरा तर इतके लाड करतो की...”
.
.
.
“मग नक्की झालं काय?”
.
.
.
“काही नाही मॅडम, स्वयंपाकाला घेतलं होतं सकाळी... काही केल्या स्टोव्ह पेटतच नव्हता... प्रेशर वाढवले... काडी पेटवली... तर अचानक स्फोटच झाला... नंतरचं काहीच आठवत नाही...”
.
.
.
“नंतरचं..? म्हणजे, आधीचं नीट आठवतंय तुला...”
.
.
.
“हो... क्का, काय झालं..?”
.
.
.
“ताई, स्टोव्ह नव्हता तुझ्या घरी... कधीच!!! झडती-जबाब झालेत आमचे... ... मरणाच्या दारात तरी निदान खरं बोलायचंस..!”
*= Burn Ward
अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

अगदी बरोबर घरात स्टोव्ह नसेल तरीही भडका शेवटी स्टोव्हचाच होतो
ReplyDeleteपुरुषप्रधान संस्क्रुती
ReplyDeleteखर आहे सर
ReplyDeleteपुरूष संस्कृतीचे हे बोलके उदाहरण . स्री ही भोग वस्तू समजून काही समस्या निर्माण झाली की असेच होते.शेवटी जीवन जगत असताना व मरणानंतरही काही बाबतीत अशीच परिस्थिती येते.
ReplyDeleteआपण खरा जबाब दिला आणि जर का यातून वाचलो तर....
ReplyDeleteपुन्हा तेच. या भितीने एवढे अन्याय अत्याचार भोगून सुध्दा महीला असा जबाब देते.
Thanks all for your comments.
ReplyDelete