Skip to main content

Posts

वंशाचा दिवा (The son!)

“वंशाचा दिवा” (ललित लेख ३१; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story ✓ ४० वर्षांपूर्वी- “पेढे घ्या अक्का; मुलगा झाला... ‘वंशाला दिवा’ मिळाला! “बरंय बाई; मला चारी पोरीच झाल्या... दिवा न्हाय; पणत्या म्हणं..!” “पणत्या का दिवट्या..?” ✓ ५ वर्षांपूर्वी- “आई... आम्ही सगळे ‘वेगळे’ राहतोय आता... सगळ्यांचीच घरं लहान आहेत... त्यात तू म्हणजे... तसं नव्हे; पण...” . “ आईची अडचण झाली का बाबांनू..?” . . . ... नीरवता... √ कालपरवाच- चारही मुलं आईला मारतायंत... . “गावात मागून खातेस, आई?” . “ आई म्हणायलाही लाज वाटते तुला...” . “मागच्याच महिन्यात ५०० रुपये पाठवले होते ना मी? काय केलंस त्याचं? इतकं लागतं का खायला तुला?” . “आरं लेकरा, पाश्श्यात काय हुतंय? आठ दिस बी पुरत न्हाईत ते...” ✓ आज- “तुम्ही उरकून टाका तिचं सगळं , सरपंच... पैसे पाठवतो आम्ही... यायला जमायचं नाही...” . . . . . (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६...

जिंकलं कोण- ही ‘ती’ की ती ‘ती’? (Democracy and women power)

जिंकलं कोण- ही ‘ती’ की ती ‘ती’? (स्त्रीशक्ती, लोकशाही आणि सत्ता) (ललित लेख ३०; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story √ ‘निकाला’चा दिवस! १७ सदस्यीय ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ९-८ असा लागलेला... त्यातील एक सदस्या काठावर उभी... इकडची पण आणि तिकडची पण... अशी! सामना रंगला असतानाच ‘ती’ (= सदस्या) गायब! ‘आठ’वाल्यांनी ‘ती’ला आदल्या रात्री उचललंय... ‘नऊ’वाल्यांकडे धागधूग... कारण; पहिली ‘ती’ जिकडे; तिकडेच दुसरी ‘ती’ही (= सत्ता) जाणार! ‘नऊ’वाल्यांच्या गळाला ‘ती’चा नवरा! . . . . . √ सरपंच निवडीचा दिवस- ‘आठ’वाले पोलिस बंदोबस्तात ‘ती’च्यासह ‘नऊ’जणांना घेऊन पोहोचतात! तुफान दगडफेक... निवडणूक अधिकारी घायकुतीला... पोलिसांचा लाठीचार्ज... . . . . . ‘ती’चा नवरा: गपगुमान ‘नऊ’वाल्यांच्याकडं जा... तू तिकडनंच निवडून आल्यास! ‘ती’: आलती, पर आता न्हाय... आता मी अन् सत्ता दोनीबी ‘आठ’वाल्यांच्याकडंच हाय... नवरा: मग मी सोडली तुला... ‘ती’: तू कशाला, मीच देते सोडचिठ्ठी... ‘सरपंच’ व्हणाराय मी गावची... . . . ...

आपलेच ओठ खाणारे आपलेच दात..! (When our own people rip us apart...)

“आपलेच ओठ खाणारे आपलेच दात..!” ( When our own people rip us apart...) (ललित लेख २९; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story डिसेंबर २०१७ मधील ‘उगाचच अस्वस्थ’ वाटणारी एक दुपार! ‘इंज्युरी सर्टिफिकेट’साठी आलेली एक मध्यमवयीन स्त्री, तिची आई आणि भाऊ..! “ तुमच्या भैणीसारकी हाय ती लेकरा... नीट तपासा... पुलिसास्नी द्याचंय सर्टिफिकाट...” आजी म्हणाल्या. “आजी, ताईंचं गळ्याभोवतीचं हाड तुटलंय... फोटोत* दिसतंय... सहजासहजी तुटत नाही ते... मारहाण वगैरे?” “ तसं काही नाही... म्हणजे...” भाऊ म्हणाला. “... ‘तसं काही’ म्हणजे..?” “ डॉक्टरांच्यापासून काय लपवायचं म्हणा..! खरंय तुमचं... तिच्या दिरानेच तिच्यावर बलात्कार... ” “ ... तुम्ही ‘इंज्युरी सर्टिफिकेट’ का मागताय मग..? सरळ ३७६ नोंदवा की बलात्कारासाठी...” “ नाही सर... हिच्या मुलीचं ठरलेलं लग्न मोडेल मग... घराला वाळीत टाकेल भावकी...” “ का? यांची काय चूक त्यात! !!” “ तसंचंय, सर... आपलेच दात; आपलेच ओठ..! ” . . . . . .   सुन्नपणा .   हतबलता आणि, ....

राशोमोन! (Rashomon)

“राशोमोन” (Rashomon)# (ललित लेख २८; © डॉ. अमित) (सत्य घटनेवर आधारित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story २०१५; ग्रामीण रुग्णालय, विरार. मी एका साडेतीन वर्षांच्या मुलीचे ए. डी. सी.* भरतोय. बाजूलाच पोलिशी चौकशी चालूयं. तीन बाजू- (१) पहिली - समोरच मुलीचा बाप! “काय झालं होतं मुलीला?” “पावण्याच्या लग्नातनं चालत येत हूतो सायेब... वाट्ंला अंदार हुता... बंदाऱ्याचा काट दिसला नसंल पुरगीला... तोल जाऊन खाली मोट्या कातळावर पडली...” (२) दुसरी- मुलीची आई. न विचारताच, “... ह्यनंच ढकलून दिलं माज्या पोरीला. संशे घेत हुता माज्यावर... काल पोरीचा काटा काडला ××××नं... झोडा त्यला स्ठेशनात निऊन...” (३) खरी- पोलिस पंचनामा. “मयत मुलीच्या आईचे लग्नात उपस्थित असलेल्या ***** नामे व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. मयताच्या वडिलाने सदरबाबत जाब विचारला असता चिडून जाऊन महिला आणि तिच्या प्रियकराने संगनमताने मुलीला बंधाऱ्यावरून ढकलून देऊन तिचा घातपात केला.” [ # राशोमोन - जगप्रसिद्ध सिनेदि...

आले देवाजीच्या मना... (By chance, luck or anything else?)

“आले देवाजीच्या मना...” (By chance, luck or anything else?) (ललित लेख २७; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story २०१३ मध्ये मी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असतानाचा योगायोग ! “अहो, तुम्ही दोघे माझ्या आजी-आजोबांसारखे आहात म्हणून सांगतोय... अजून दोन दिवस थांबा... न्यूमोनियाच्या इंजेक्शनचा कोर्स पूर्ण होईल...” “न्हाई आता डाक्टर सायेब... शेतीची कामं हाईती... जित्राबं हायंत...  लई कामं खोळांबल्यात... सुट्टी द्या आमास्नी...” “सगळं समजावून झालंय आजी; तरीही जायचंच असेल तर तुमच्या जबाबदारीवर सही करून जा...” “व्हय... नशीब आमचं... इट्टलाला काळजी... ” . . . . . संध्याकाळी एस. टी.च्या अपघाताची बातमी पोलिसांनी कळवली. त्यातील रुग्ण जेव्हा तपासणीसाठी माझ्याकडे आणले तेव्हा पाहतो तर काय, ‘ते’च आजी-आजोबा साक्षात स्ट्रेचरवर..! “... लेकरा, तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं...” आजी ‘कण्हत’ म्हणाल्या... “तसं काही नसतं आजी...” कुठल्यातरी ‘गूढ शक्तींबद्दलच्या’ विचारांत  असताना मी म्हटलं... (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, ए...

भिकारी आणि याचक (A beggar and a demandant!)

“भिकारी आणि याचक!” (ललित लेख २६; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story ‘हेक्टिक ड्यूटी’ संपवल्यावर मन प्रसन्न व्हावं म्हणून औरंगाबादेतल्या वरदगणेश मंदिरात जाऊन बसलो होतो..! दर्शनरांगेतील एकीने माझे लक्ष वेधले... कळकट-मळकट साडीत, सोबत एक फाटकी बॅग घेऊन उभी असलेली साठीतली एक महिला... भिकारीणच ती! जवळच्या पुडक्यातील १०-१० च्या दोन नोटा आणि एक रुपयाचं नाणं काढून तिथल्या ‘दान’ पेटीत टाकून तिने नारळही वाढवला. मग, हात जोडून मनोभावे नमस्कार करून ती पुटपुटली, “असंच ठीव रं बाबा आमास्नी समाधानी ; सारकं-सारकं यीत जाईन तुझ्या देवळात; नारळ बी फोडत जाईन तुला...” परतण्याआधी आणखीन एकदा नमस्कार करून बाहेर पडताना सोन्यात मढलेला एक ‘उच्चभ्रू’ देवासमोरच्या मूषकाच्या कानात याचना करत होता, “ एवढं एक टेंडर मिळूदे देवा, तुला पाच सोन्याच्या नारळाचं तोरण बांधीन..!” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot.com www.trekdoctor...

तुझ्या सुखात हसणार मी..! (Finding happiness others happiness..!)

“तुझ्या सुखात हसणार मी..!” (कपडेवाली ‘बाई’: भाग २) (ललित लेख २५; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story “घ्या, तुमच्या नव्या बाळासाठी कपडे घ्या. बाळाला गरम ठेवा. मावशी, ताई, अक्का... स्वस्तात घ्याऽऽऽ...” “मावशी, थांबा... दाखवा बगू, कसली कापडं हायंती?” “लहान बाळांचे आहेत; चांगले आहेत... घ्या...” “किती रुपये जोडी, मावशी?” “शंभर, ताई... दोन घ्या; १८० ला... दोन लागतीलच की...” . . . . . “... अवो मावशी, हे टकुचं आलं की ज्यादाचं चुकून... आमी फकस्त दोन सदरा-चड्डी जोड्याचंच पैकं दिलतं तुमाला..! घ्या ह्ये परत...” “... चुकून नाही; मुद्दामच दिलंय मी ते... ठेवा, असूद्या... (पुटपुटत) तसंही माझ्याजवळ एखादं जास्तीचं राहूनही काही फायदा नाही म्हणा...” “म्हंजी ओ मावशी... काय झालं..?” “काही नाही हो... मूलबाळ नाही मला... म्हणून नवऱ्यानं सोडलं...माहेरच्यांनीही घरात घेतलं नाही...” . . . . . “... हे कपडे असून उपयोग काय? घालू कुणाला ती..?” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त...