Skip to main content

Posts

संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..!

संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..! पहाटे ‘जॉगिंग’साठी करूळ घाटात गेलो होतो. घाटाच्या मध्यावर एक ऊसाचा ट्रक उलटलेला दिसला. “कुणाला लागलं आहे का?” तिथे बसलेल्या शेतकऱ्याला मी विचारले. “न्हाई, सायेब... मेलो असतो तर चाललं असतं... ऊस पण गेला आन् गाडी पण गेली,” तो. “काही मदत हवी असेल तर सांगा,” मी. फिरून परत येईपर्यंत शेतकऱ्याच्या घरची माणसं तिथे पोहोचली होती. ‘वरसाची कमाई पाण्यात गेली’ म्हणून ती मोठमोठ्यानं रडत होती. . . . त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारमधून एक स्त्री खाली उतरून शेतकऱ्याला म्हणाली, “थोडा ऊस द्या की... संक्रातीला पूजा करायला पाहिजेत.” “परसंग काय आन् तुमचं काय, ताई?! घ्या ऊस... पर हे ऐकण्यापेक्षा मी मेलो असतो तर..,” आशाळभूत शेतकरी हतबलपणे म्हणाला. (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम.बी.बी.एस.,एम.डी. (बालरोग)) (© सदर लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन आहेत.) (सदर लेखकाचा दुसरा वाचनीय ब्लॉग- www. dramittukarampatil.blogspot.com )

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावधीत पगार घेणारे ‘सीईओ’ नेमले जातात तेव्हा त्यांना मुलाखतीत नेमके काय प्रश्न विचारले जातात’ याबद्दल सद्गुरुंच्या मनात असणाऱ्या कुतुहलापोटी त्यांनी एका बड्या ‘एचआर’ला विचारले. बरीच उत्कंठा वाढवून एचआर म्हणाले, “आम्ही त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या अपयशाबद्दल आणि त्यातून ते कसे बाहेर पडले याबद्दल विचारतो.” . . . मला त्यानंतर उगाचच अपयशी असल्यासारखे वाटून मी खिन्न झालो. . . . प्रसंग- २ रात्री आई फोनवर माझ्याशी बोलत होती, “अरे, माझी एक जुनी मैत्रीण आज भेटली होती... तू स्वतःहून आदिवासी भागात सेवा देऊन आणि इतक्या अडचणींवर मात करून ‘एमडी’ला ॲडमिशन मिळवलंस याचं तिला इतकं कौतुक वाटलं की, विचारूच नकोस...” . . . ... अरेच्चा!   मीही तर ‘सुंदर पिचाईच’ होतो की ..!

व्यवस्था: व्हेंटिलेटरची की व्हेंटिलेटरवरची? (System: For ventilator or on ventilator?)

“व्यवस्था: व्हेंटिलेटरची की व्हेंटिलेटरवरची?” (System: For ventilator or on ventilator?) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग १- “ काहीही करा जोशी; पण व्हेंटिलेटर आले पाहिजेत ... पेशंट किती वाढले आहेत बघा... ‘क्रिटिकल’ झालीये ‘सिच्युएशन’ एकदम... ‘कोटेशन’ मागवा... दोन-तीन कंपन्या आहेत बऱ्यापैकी काम करणाऱ्या,” अधिष्ठाता ‘सीएओं’ना* म्हणाले. “सर, पण प्रशासकीय मंजुरी वगैरेला वेळ लागेल... कलेक्टर साहेबांनीही खर्चावर नियंत्रण ठेवायला सांगितले आहे मागील बैठकीत,” जोशी उत्तरले. “मी बोलतो साहेबांशी... पेशंटचे जीव महत्त्वाचे आहेत की ‘प्रोसेस’ की खर्च,” डीन म्हणाले... प्रसंग २- “आज आपल्या शासकीय रुग्णालयात जे १० व्हेटिंलेटर आले आहेत त्यामुळे येथील जनतेला खूप फायदा होणार आहे. याकरिता  आम्ही खूप प्रयत्न केले.  जिल्हाधिकाऱ्यांनीही  जोर लावला,” उद्घाटनप्रसंगी लोकप्रतिनिधी म्हणाले. प्रसंग ३- वर्तमानपत्रातील बातमी- “ व्हेंटिलेरच्या अनुपलब्धतेमुळे  शासकीय रुग्णालयाच्या ‘ अधिष्ठात्यां’चीच  प्रकृती ढासळली... जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा... अधिष्ठात्यांंनाा स्वतःचेेच...

स्त्री-पुरूष समानतेची ऐशीतैशी..! (Gender equality: The novel way..!)

“स्त्री-पुरूष समानतेची ऐशीतैशी..!” (Gender equality: The novel way..!) (ललित लेख ४४, © डॉ. अमित) पर्मनंट वैद्यकीय अधिकारी म्हणून आदिवासी भागात झालेले पहिलेच पोस्टिंग... वेगळे लोक, वेगळी संस्कृती... . . . रात्रीच्या आठ वाजता क्वार्टरचा दरवाजा कोणीतरी वाजवला... . . . डोक्याला पट्टी बांधलेल्या आणि रक्ताळलेला शर्ट घातलेल्या आजोबांना बघताच मी गडबडीत पळतच पीएचसीत गेलो. . . . “घाबरू नका आजोबा, भूल देऊन टाके घालू... आणि दोन इंजेक्शन... झालं मग... दहा मिनिटाचं काम...” . . . “पर, त्यच्यासाटी नाय आलोय म्याहयान¹¹... पयल्यांदा केस कर... डोखरी¹ लई मांजली²...” . . . “दाक्टर, हिकडं नांग³... रोज रातीला⁴ कुटतंय⁵ मह्यंला... मह्यला⁶ बरडेव⁷, डोकीत⁸ मारतंय ह्यो वाडघोबास⁹... मांग¹⁰  म्याहयान¹¹ कुटलं... ” मागून येऊन आजी म्हणाली. . . . “कायंबी सांगताव¹² का दाक्टरला, डोखरे..?” . . . “ आजी, तुम्ही दारू पिलाय?” मी... . . . “व्हय, मांग आमी डोखरा-डोखरी रोज पिताव ... कुटतो बी रोज एकमेकायले¹³... ” ____________________________________________________________ (वरील लेखात वारली भाषेचा मी वापर केला आहे. महाराष...

“भडका: स्टोव्हचा... की, नात्यांचा..?” (The blown up relations...)

“भडका: स्टोव्हचा... की, नात्यांचा..?” (The blown up relations...) (ललित लेख ४२, © डॉ. अमित) एम. बी. बी. एस.ला असताना ‘शल्यचिकित्सा’ विभागातील ‘जळीतकक्षा’तील* पहिलाच दिवस! . . . ९०% भाजलेल्या एका महिलारुग्णाचा पोलिस जबाब घेतायंत... . . . “ताई, नीट सविस्तर सांग काय ते... सासरचे जाच करत होते का..?” महिला पी. एस. आय. म्हणाल्या. . . . “नाही, नाही... खूप चांगली माणसं आहेत हो ती... सासू-सासरे तर माई-आण्णांसारखे प्रेम करतात माझ्यावर... नवरा तर इतके लाड करतो की...” . . . “मग नक्की झालं काय?” . . . “काही नाही मॅडम, स्वयंपाकाला घेतलं होतं सकाळी... काही केल्या स्टोव्ह पेटतच नव्हता... प्रेशर वाढवले... काडी पेटवली... तर अचानक स्फोटच झाला... नंतरचं काहीच आठवत नाही ...” . . . “नंतरचं..? म्हणजे, आधीचं   नीट आठवतंय तुला ...” . . . “हो... क्का, काय झालं..?” . . . “ताई, स्टोव्ह नव्हता तुझ्या घरी... कधीच!!!  झडती-जबाब झालेत आमचे... ... मरणाच्या दारात तरी निदान खरं बोलायचंस..!” *= Burn Ward अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३...

कधी वकील आणि कधी न्यायाधीश! (An advocate and a judge!)

कधी वकील आणि कधी न्यायाधीश! (An advocate and a judge!) (ललित लेख ४१, © डॉ. अमित) ✓ प्रसंग-१ “... ट्रिपल सीट फिरतात काय? लायसन्स काढून घ्या तिघांचे पण... आणि, ऐकत नसतील तर सरळ केस करा ...” “साहेब, ‘ मित्र अपघातात सीरियस झालाय म्हणून निघालो होतो’ म्हणतात... एकजण तर म्हणतो, ‘माझे वडीलच ‘इनचार्ज’ आहेत इथले, मला भेटू द्या त्यांना’ ...” “साबळे, त्यांच्या कथा काय ऐकताय? ठोकून काढा तिघांना पण... चांगली अद्दल घडवा ...” ✓ प्रसंग-२ “साबळे, काय म्हणतायंत ते तिघे? घरी फोन लावले का त्यांच्या?” “बापरे... मुलाचे २२ मिस्डकॉल..? मीटिंगमध्ये फोन ‘सायलंट’ असल्यामुळे लक्षात आले नाही माझ्या...” “हे काय, रिंग तर इथेच वाजतेय...” “साहेब, ‘त्या तिघांत’ तुमचाही मुलगा आहे... तोच फोन करत होता तुम्हाला...” “साबळे, तुम्ही माझ्या मुलाला पकडलंय... काही अक्कल वगैरे? सोडा त्या सगळ्यांना आधी... ” अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot.com www.trekdoctoramit.blogspot.com

दुटप्पीपणा (भाग ३) Hypocrisy (Part 3)

दुटप्पीपणा (भाग ३) Hypocrisy (Part 3) (ललित लेख ४०, © डॉ. अमित) ‘विशेष निधी’चे वाटप झाल्यानंतरची जिल्ह्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याची बैठक... . . . “हे बघा, अॅम्ब्युलन्सच्या डागडुजीसाठी प्रत्येकी दहा हजारांचा निधी आला आहे... इतके काही लागत नसतातच... पाच-पाच हजार ‘वळते’ करा... ‘समझनेवालों को..!’ ” . . . “पण, सर, आमची अँब्युलन्स खूपच खराब आहे. तीस हजार तरी लागतील म्हणतो इंजिनीअर... गावात दुसरी गाडी नाही.. “तुम्ही नवीन आहात खात्यात... ‘समजेल’ हळूहळू... खूप विचार करू नका गावाचा” “सर, मागच्या महिन्यात एक गरोदर माता मृत्यूमुखी पडली... गाडी चालूच झाली नाही आमची शेवटपर्यंत... दवाखान्याजवळच तडफडून मेली बिचारी...” “मूर्ख आहात का तुम्ही? तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही हे सगळं? बसा गप्प... पैसे पाठवा इकडे आणि जा समाजसेवा करायला... ‘वर’ पर्यंत सगळ्यांना ‘ सांभाळावं लागतं’ मला...” अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot.com www.trekdoctoramit.blogspot.com

दुटप्पीपणा (भाग २) Hypocrisy (Part 2)

दुटप्पीपणा (भाग २) Hypocrisy (Part 2) (ललित लेख ३९, © डॉ. अमित) नक्षलग्रस्त भागातील सुदूर असणारे एक कार्यालय... आदल्या रात्री वरिष्ठांचा कर्तव्यावरील अधिकाऱ्याला फोन येतो. “उद्या आपल्या डिपार्टमेंटच्या सचिव मॅडम येणार आहेत ‘व्हिजिट’ला. ‘व्यवस्था’ चोख ठेवा . मागच्या वेळी एकाला ‘सस्पेंड’ केलं होतं बाईंनी.” “बोरसे ना? त्यांचा तर मॅडमच्याच हस्ते ‘उत्कृष्ट कामा’साठी सत्कार झाला होता... तरीही... चुकीचाय ना हे...” “जाऊ द्याऽऽऽ... चालायचंच ... तुम्ही उद्याचं बघा...” दुसऱ्या दिवशी... मॅडम म्हणतात, “ तुमचं कौतुक आहे. तुम्ही इतक्या दुर्गम भागात राहून काम करता. जेवणाची वगैरे काय व्यवस्था इथे?” “इथे काहीच उपलब्ध नाही मॅडम... जवळचं हॉटेल ३० किलोमीटरवर आहे...” “अरे बापरे! अवघडच आहे...” “हो, मॅडम...” “ ते जाऊदे ... आमच्या आजच्या सरबराईचं काय? २५-३० लोक आहेत बरोबर... ‘सीआर’* चांगला हवाय ना. *सी.आर.- (अधिकाऱ्यांच्या वर्षभरातील कामाचा) गोपनीय अहवाल; हा वरिष्ठांनी गोपनीयपणे लिहायचा असतो. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dram...

दुटप्पीपणा (भाग १) Hypocrisy (Part 1)

दुटप्पीपणा (भाग १) Hypocrisy (Part 1) (ललित लेख ३८, © डॉ. अमित) ✓ प्रसंग १- महाराष्ट्रातील एका कुपोषणग्रस्त जिल्ह्यातील एक उच्चस्तरीय शासकीय बैठक... “डॉक्टर, तुमचं काम कुपोषित बालकांवर उपचार करण्याचे आहे...  अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून त्यांचा आकडा ‘ठरवू’ आम्ही; तुमची ढवळाढवळ नको आहे आकडेवारीत... समजलं?” “पण सर, ‘तज्ज्ञ’ तर आम्ही आहोत ना... सेविकांचे आकडे कसे खरे मानायचे? त्यांच्या रिपोर्टपेक्षा आकडा कितीतरी मोठा आहे...” “डॉक्टर, खाली बसा गप्प... आम्ही ठरवू काय ते...” ✓ प्रसंग २-  एका मोठ्या वृत्तवाहिनीचा ‘ग्राउंड रिपोर्ट’ ... “ ××× तालुका सर्वाधिक कुपोषणग्रस्त... कुपोषित बालकांचा आकडा अधिकाऱ्यांनी दाबला... शासनाची दिशाभूल...” ✓ प्रसंग ३- “कोण डॉक्टर आहे त्या भागात? ‘शो-कॉज’* काढा...” “पण सर, ते मागच्या मीटिंगलाच सांगत होते, आकडा मोठा आहे म्हणून... तुम्हीच त्यांना गप्प बसवलं ...” “... तुमचा शहाणपणा नकोय आता... चौकशी होईपर्यंत निलंबित करा त्यांना...” - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -  *शो-कॉज= कारणे दाखवा नोटिस...

“टू बी ऑर नॉट टू बी...” (To be or not to be...) (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2)

“टू बी ऑर नॉट टू बी...” (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2) (© डॉ. अमित, ललित लेख ३७) ✓ प्रसंग १- “कशाला एवढं ‘टेन्शन’ घेताय, सर? लाख-दोनलाख घ्या आणि करून टाका सही... तुम्हाला नको असतील तर ‘वर-खाली’ वाटून टाका...” “जोशी, फार बोलू नका... सेक्रेटरी आहात, सेक्रेटरीसारखे रहा... मला माहितीये ‘काय बरोबर, काय चूक’ ते...” “... साहेऽब, माझेही केस उगाच नाही पांढरे झाले... तुम्ही कालपरवाचे... तुमच्या भल्याचंच सांगतोय... बघा ‘वरून’ फोन येतो की नाही ते...” ✓ प्रसंग २- साहेबांना त्यांच्या साहेबांचा फोन येतो... “संदीप, तुला माहितीये, दरवर्षी १००-१२५ लोक आयएएस होतात... तू काही एकटाच नाहीस... मर्यादेत रहा... रहेजाच्या फाईलवर सही करून टाक... आदेश समज हवंतर...” “... पण, सर..,” फोन कट होतो... ✓ प्रसंग ३- “काय करू मी..? माझे संस्कार, तत्त्वं, स्वच्छ चारित्र्याची तळमळ, गरिबांना न्याय... सगळं एकदम पाण्यात..! ” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot.com www.trekdoctoramit.blogspot.com

संदिग्धता (भाग १) The dilemma (Part 1)

संदिग्धता (The Dilemma) (© डॉ. अमित, ललित लेख ३६) ✓ प्रसंग १- “डॉक्टर, कसे आहेत रिपोर्ट्स? अहो, गेली सतरा वर्षे बाळाची वाट बघतोय आम्ही... बाळ होत नसल्यामुळे काय काय सहन नाही केलं मी... बाहेरच्यांचे टोमणे, घरी सासू-नणंदेचा ‘जाच’... जाऊदे... सांगा ना लवकर, सर...” आरती म्हणाली. “हो, समजू शकतो... जग असंच असतं” डॉक्टर म्हणाले, “पण निराश होऊ नका... आज ‘गूडन्यूज’ आहे तुमच्यासाठी... Time to Celebrate..!” ✓ प्रसंग २- घरी आल्यावर पाहते तर काय, घरी मोठा आक्रोश सुरू आहे... सगळे रडताहेत... “अहो आई, काय झालं? नणंदबाई, तुम्ही तरी बोला की...” . . . “अगं काय बोलू? माझा एकुलता एक लाडका लेक सोडून गेला गं आपल्याला... शाळेतून येताना ट्रकने उडवलं त्याला... आता कुणाकडे बघू मी..?” ✓ प्रसंग ३- . . . कसं ‘रिअॅक्ट व्हावं आरतीने..? काय वाटतं तुम्हाला?” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी‌. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot .com www.trekdoctoramit.blogspot.com

टू बी ऑर नॉट टू बी... (To be or not to be)

“टू बी ऑर नॉट टू बी...” (© डॉ. अमित, ललित लेख ३५) ✓ भाग १- पास दाखवूनही तलाठी ‘कोरोना’च्या भीतीने संजयला गावात घेईना, तेव्हा त्याने सरपंच असलेला त्याचा मित्र पोपट याला फोन केला. . . . ✓ भाग २- “नाय बा संजू... लोकं ठोकतील मला... मी आत्ता तुला काईच मदत करू शकत नाही... नाईलाज हाय माजा...” . . . “पोपट, अरे काय हे? इतक्यात विसरलास? मागच्या पुरात तुझं घर जमीनदोस्त झालं तेव्हा मी तुला लाखभर रुपये न मागता दिले होते... फक्त मैत्रीसाठी ... आणि आता तू..?” संजय म्हणाला. . . . “तुजं पैसं दोन म्हैन्यात देतो... इतकं काय बोलून दाखवाय नगं... मी कुटं तुज्याकडं मागाय आलतो ? तूच ठिऊन गेल्तास...” . . . “म्हणजे, मदत करून मीच चुकलो आणि आता मला गरज आहे तर...” . . . “ते तुजं तू ठरव ... आता मातूर गावात यिऊ नगंस...”   (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot.com www.trekdoctoramit.blogspot.com

“हत्या... की, आत्महत्या..?” (A cold blooded murder... or the suicide..?”

“हत्या की आत्महत्या?” (ललित लेख ३४, © डॉ. अमित) Add caption ✓ भाग १-  “असे कसे रुळावर झोपता तुम्ही? थोडीतरी अक्कल-बिक्कल..?” पोलिस अधिकारी खेकसला. . . . “रुळावर झोपलात ते झोपलात... रेल्वेचा एवढा मोठा आवाज नाही आला कारे तुम्हाला..? बेशुद्ध पडला होता का..? आता द्या यांना लाखांत नुकसानभरपाई..,” रेल्वेचा अधिकारी ओरडला. . . . “तुमच्या घरातले आठ लोक गेले, काय वाटतंय? प्रवास ‘असा’ संपेल असं कधी वाटलं होतं?” पत्रकारांची मुलाखत... . . . “×××, गरीब झाले तर काय उपकार करतात का आमच्यावर? लुटा आता आम्ही ‘प्रामाणिक’पणे भरलेल्या टॅक्सचे पैसे आणि मारा मजा ..!” उच्चमध्यमवर्गीय घरातील चर्चा... . . . ✓ भाग २- “का वाचवलंस देवा मला..? कशाची ही शिक्षा ..? जमंल तसं कष्ट केलं की... किती दिवस बायकापोरांना उपाशी ठेऊ..? बरं झालं त्यांना सोडवलंस ..!” शून्यात नजर लावून सिस्टीमने ‘जिवंत’पणी ‘मारलेला’ मजूर म्हणाला... (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) (केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५) www.dramittukarampatil.blogspot.com www.trekdoctoramit.blogspot.com

मरणाचा चॉईस... (The choice of death...)

“मरणाचा चॉईस” (ललित लेख ३३, © डॉ. अमित) * तळटीप स्टेशनात विश्रांती घेणारे मालगाडीचे इंजिन शेजारच्या इंजिनाला म्हणाले, “माझी चाकं धुऊन मी केलेलं पाप जाणाराय का? धुवायचं सोड; ते लपवता तरी येणारंय का?” . . . “... आपण माणसं थोडीच आहोत; गंगेच्या पाण्यात डुबकी मारून ‘केलेली’ पापं ‘धुवायला’..?” . . . दुसरे इंजिन बिथरून म्हणाले, “झालंय काय तुला आज? चक्क ‘माणसा’सारख्या पापपुण्याच्या गोष्टी करतोयंस..!” . . . “... काय करू मग, सांग ना... काल ‘त्या’ गोरगरिबांना मी चाकाखाली चिरडले... रक्तामासांने भिजलो... ‘घामा’ने दरवळलो... चाकं धुतली; पण, झालेल्या पापाचं..?” . . . “... कसलं पाप? उलट जीवन‘चक्रा’तून ‘सोडवलंस’ तू त्यांना... आजाराने नाहीतर भुकेने; मरणारच होते ते... आणि, मरायचा तरी ‘चॉईस’ कुठंय गरिबांना..! जिवंतपणी कुणी विचारपूस केली त्यांची, जी आत्ता होणाराय?” . . . “... माणसं नाही रे; माणुसकीच मेलीय चाकांखाली..!” (* तळटीप- सदर चित्र हे मी फेसबुकवरून डाउनलोड केले असून ते बनविणाऱ्याचे नाव मला सापडले नाही. चित्राचे संपूर्ण क्रेडिट हे संबंधित चित्रकाराचेच आहे.) (...

तेरावं..! (Post death late rituals..!)

“तेरावं..!” (ललित लेख ३२; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story “काका, १०० किलो तांदूळ, ५० किलो डाळ, मीठ मसाला... लागतं ते सगळं द्या... वडिलांचं तेरावं मोठं करायचंय... तेवढीच त्यांच्या आत्म्याला शांतता...” “बाळू, पाण्याचं बघ... एखादा टँकर वगैरे... आणि, उन्हं कडक आहेत... मांडवाचंही...” . . . . . “तुमचे वडील यायचे आमच्या दुकानात... तुम्ही लहान असताना दर रविवारी ठरल्याप्रमाणे गोड शेव, जिलेबी आणि हां, छोटी खारीची बिस्किटे खास ‘माझ्या दाद्यासाठी’ म्हणून, म्हणजे तुमच्यासाठी न्यायचे,” दुकानदार म्हणाला... . . . . . “... पण, दोन महिन्यांपूर्वी आले तेव्हा बरे नव्हते; हाडांची पार काडं झाली होती... ‘पुतण्याची बायको पण आता रोज जेवायला वाढत नाही; पोरांचा तर पत्ताच नाही’ म्हणाले...” . . . “ माफ करा; पण ‘भूकेनेच व्याकुळ होऊन गेले’ म्हणातयंत लोक... तुम्ही ‘थोडं लवकर’ यायला हवं होतं, नाही!!! ” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ ...

वंशाचा दिवा (The son!)

“वंशाचा दिवा” (ललित लेख ३१; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story ✓ ४० वर्षांपूर्वी- “पेढे घ्या अक्का; मुलगा झाला... ‘वंशाला दिवा’ मिळाला! “बरंय बाई; मला चारी पोरीच झाल्या... दिवा न्हाय; पणत्या म्हणं..!” “पणत्या का दिवट्या..?” ✓ ५ वर्षांपूर्वी- “आई... आम्ही सगळे ‘वेगळे’ राहतोय आता... सगळ्यांचीच घरं लहान आहेत... त्यात तू म्हणजे... तसं नव्हे; पण...” . “ आईची अडचण झाली का बाबांनू..?” . . . ... नीरवता... √ कालपरवाच- चारही मुलं आईला मारतायंत... . “गावात मागून खातेस, आई?” . “ आई म्हणायलाही लाज वाटते तुला...” . “मागच्याच महिन्यात ५०० रुपये पाठवले होते ना मी? काय केलंस त्याचं? इतकं लागतं का खायला तुला?” . “आरं लेकरा, पाश्श्यात काय हुतंय? आठ दिस बी पुरत न्हाईत ते...” ✓ आज- “तुम्ही उरकून टाका तिचं सगळं , सरपंच... पैसे पाठवतो आम्ही... यायला जमायचं नाही...” . . . . . (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६...

जिंकलं कोण- ही ‘ती’ की ती ‘ती’? (Democracy and women power)

जिंकलं कोण- ही ‘ती’ की ती ‘ती’? (स्त्रीशक्ती, लोकशाही आणि सत्ता) (ललित लेख ३०; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story √ ‘निकाला’चा दिवस! १७ सदस्यीय ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ९-८ असा लागलेला... त्यातील एक सदस्या काठावर उभी... इकडची पण आणि तिकडची पण... अशी! सामना रंगला असतानाच ‘ती’ (= सदस्या) गायब! ‘आठ’वाल्यांनी ‘ती’ला आदल्या रात्री उचललंय... ‘नऊ’वाल्यांकडे धागधूग... कारण; पहिली ‘ती’ जिकडे; तिकडेच दुसरी ‘ती’ही (= सत्ता) जाणार! ‘नऊ’वाल्यांच्या गळाला ‘ती’चा नवरा! . . . . . √ सरपंच निवडीचा दिवस- ‘आठ’वाले पोलिस बंदोबस्तात ‘ती’च्यासह ‘नऊ’जणांना घेऊन पोहोचतात! तुफान दगडफेक... निवडणूक अधिकारी घायकुतीला... पोलिसांचा लाठीचार्ज... . . . . . ‘ती’चा नवरा: गपगुमान ‘नऊ’वाल्यांच्याकडं जा... तू तिकडनंच निवडून आल्यास! ‘ती’: आलती, पर आता न्हाय... आता मी अन् सत्ता दोनीबी ‘आठ’वाल्यांच्याकडंच हाय... नवरा: मग मी सोडली तुला... ‘ती’: तू कशाला, मीच देते सोडचिठ्ठी... ‘सरपंच’ व्हणाराय मी गावची... . . . ...

आपलेच ओठ खाणारे आपलेच दात..! (When our own people rip us apart...)

“आपलेच ओठ खाणारे आपलेच दात..!” ( When our own people rip us apart...) (ललित लेख २९; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story डिसेंबर २०१७ मधील ‘उगाचच अस्वस्थ’ वाटणारी एक दुपार! ‘इंज्युरी सर्टिफिकेट’साठी आलेली एक मध्यमवयीन स्त्री, तिची आई आणि भाऊ..! “ तुमच्या भैणीसारकी हाय ती लेकरा... नीट तपासा... पुलिसास्नी द्याचंय सर्टिफिकाट...” आजी म्हणाल्या. “आजी, ताईंचं गळ्याभोवतीचं हाड तुटलंय... फोटोत* दिसतंय... सहजासहजी तुटत नाही ते... मारहाण वगैरे?” “ तसं काही नाही... म्हणजे...” भाऊ म्हणाला. “... ‘तसं काही’ म्हणजे..?” “ डॉक्टरांच्यापासून काय लपवायचं म्हणा..! खरंय तुमचं... तिच्या दिरानेच तिच्यावर बलात्कार... ” “ ... तुम्ही ‘इंज्युरी सर्टिफिकेट’ का मागताय मग..? सरळ ३७६ नोंदवा की बलात्कारासाठी...” “ नाही सर... हिच्या मुलीचं ठरलेलं लग्न मोडेल मग... घराला वाळीत टाकेल भावकी...” “ का? यांची काय चूक त्यात! !!” “ तसंचंय, सर... आपलेच दात; आपलेच ओठ..! ” . . . . . .   सुन्नपणा .   हतबलता आणि, ....

राशोमोन! (Rashomon)

“राशोमोन” (Rashomon)# (ललित लेख २८; © डॉ. अमित) (सत्य घटनेवर आधारित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story २०१५; ग्रामीण रुग्णालय, विरार. मी एका साडेतीन वर्षांच्या मुलीचे ए. डी. सी.* भरतोय. बाजूलाच पोलिशी चौकशी चालूयं. तीन बाजू- (१) पहिली - समोरच मुलीचा बाप! “काय झालं होतं मुलीला?” “पावण्याच्या लग्नातनं चालत येत हूतो सायेब... वाट्ंला अंदार हुता... बंदाऱ्याचा काट दिसला नसंल पुरगीला... तोल जाऊन खाली मोट्या कातळावर पडली...” (२) दुसरी- मुलीची आई. न विचारताच, “... ह्यनंच ढकलून दिलं माज्या पोरीला. संशे घेत हुता माज्यावर... काल पोरीचा काटा काडला ××××नं... झोडा त्यला स्ठेशनात निऊन...” (३) खरी- पोलिस पंचनामा. “मयत मुलीच्या आईचे लग्नात उपस्थित असलेल्या ***** नामे व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. मयताच्या वडिलाने सदरबाबत जाब विचारला असता चिडून जाऊन महिला आणि तिच्या प्रियकराने संगनमताने मुलीला बंधाऱ्यावरून ढकलून देऊन तिचा घातपात केला.” [ # राशोमोन - जगप्रसिद्ध सिनेदि...

आले देवाजीच्या मना... (By chance, luck or anything else?)

“आले देवाजीच्या मना...” (By chance, luck or anything else?) (ललित लेख २७; © डॉ. अमित) #१००_शब्दांत_कथा #100_word_story २०१३ मध्ये मी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असतानाचा योगायोग ! “अहो, तुम्ही दोघे माझ्या आजी-आजोबांसारखे आहात म्हणून सांगतोय... अजून दोन दिवस थांबा... न्यूमोनियाच्या इंजेक्शनचा कोर्स पूर्ण होईल...” “न्हाई आता डाक्टर सायेब... शेतीची कामं हाईती... जित्राबं हायंत...  लई कामं खोळांबल्यात... सुट्टी द्या आमास्नी...” “सगळं समजावून झालंय आजी; तरीही जायचंच असेल तर तुमच्या जबाबदारीवर सही करून जा...” “व्हय... नशीब आमचं... इट्टलाला काळजी... ” . . . . . संध्याकाळी एस. टी.च्या अपघाताची बातमी पोलिसांनी कळवली. त्यातील रुग्ण जेव्हा तपासणीसाठी माझ्याकडे आणले तेव्हा पाहतो तर काय, ‘ते’च आजी-आजोबा साक्षात स्ट्रेचरवर..! “... लेकरा, तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं...” आजी ‘कण्हत’ म्हणाल्या... “तसं काही नसतं आजी...” कुठल्यातरी ‘गूढ शक्तींबद्दलच्या’ विचारांत  असताना मी म्हटलं... (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, ए...